Pune News : उपनगर आणि परिसरात श्रींची जयंती साजरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपनगर आणि परिसरामध्ये कोरोनाच्या भीतीमुळे साध्या पद्धतीने गणेश जयंती साजरी करण्यात आली. भल्या सकाळी श्रींना महाअभिषेक केल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. मंडळांच्या वतीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच रंगीबेरंगी फुलांनी छान सजावट केल्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर चैतन्यमय वातावरण होते. भाविक-भक्तांनी श्रींचे दर्शन घेत महाप्रसादाचा आस्वाद घेतला. प्रत्येकाने मास्कचा वापर केला होता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून श्रींची उत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

विठ्ठलनगर (15 नंबर) गजानन मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष सतीश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी महाप्रसादाची भाविकांनी व्यवस्था केली होती. श्रींना अभिषेक केल्यानंतर दिवसभर भाविकांनी दर्शन घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत श्रींची जयंती साजरी करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले.

लक्ष्मी कॉलनीमधील गुरुदत्त मित्रमंडळाच्या वतीने भल्या सकाळी श्रींची महापूजा करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष आदित्य कांबळे आणि नाना आखाडे, अजित बालगुडे, सागर शिळीमकर, सारंग बोरकर, विघ्नेश पाटील, सादर व्हदाडे, जीवन तायडे, अविनाश थोरात, आकाश कटकोळे या कार्यकर्त्यांनी भाविकांना प्रसाद देण्याची व्यवस्था केली होती.

भेकराईनगर येथील त्रिमूर्ती सोसायटीमध्ये सिद्धीविनायक मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी गणेश जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष नामदेवराव मुळीक, सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चांदगुडे, सचिव अशोक खोपडे, खजिनदार लहू बुरे, उपखजिनदार सुनील बालगुडे, उपाध्यक्ष हनुमंत यादव, उपसचिव बाळासाहेब बहिरट, राजू देशमुख, यादवराव खिलारे, राजाराम बनकर, बाळासाहेब नाळे, विजय जोशी, नितीन शिंदे, गुंडू कोरे, हरिभाऊ लगड, किसनराव आटोळे, दीपक घाडगे, चंद्रकांत ताकवले आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रशांत रासकर यांनी गणेश जयंतीनिमित्त मंदिराचे पेंटिग करून दिले.