Pune News | श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती आता एका आगळ्या वेगळ्या रुपात; अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News | पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती (shrimant dagdusheth ganpati) म्हणजे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान. आज अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटेपासून शेकडो भाविकांनी मंदिराबाहेर गर्दी केली आहे. कोविडमुळे मंदिर बंद असल्याने केवळ काचेतून भक्तांना दर्शन घ्यावे लागत (Pune News) आहे.

भक्तांच्या या भावना लक्षात घेऊन संस्थेतर्फे एक आगळी वेगळी कल्पना राबविली गेली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती आता तुमच्या मोबाईलवर अवतरणार आहेत थेट आपल्या घरामध्ये अंगारकी चतुर्थीला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये विशेष आरास केली जाते़ आजवर ही आरास काचेतूनच पहायला मिळायची़ मॅटरपोर्ट या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता गाभार्‍यातील आरास थेट पाहता येईल.

इतकंच नाही तर विविध बाजूंनी मूर्तीची आरास बघताना येणार आहे. आपण थेट गाभार्‍यातच आहोत, असे वाटेल, ही संपूर्ण थ्रीडी तंत्रज्ञानामुळे आपण जशी आपली नजर फिरवितो, अशी मूर्ती व आरास आपल्याला बघायला मिळणार आहे. भक्ती आणि तंत्रज्ञानाच्या मिलनातून येणारा हा अनुभव घेण्यासाठी संस्थेने एक लिंक शेअर केली आहे. त्याद्वारे हा भक्तांना अनुभव घेता येणार आहे आणि घरबसल्या बाप्पाचे दर्शनही होणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Pune Crime | 29 लाखांच्या वार्षिक पॅकेजच्या नोकरीचे आमिष दाखवून 43 लाखांना घातला गंडा

Khadakwasla Dam | खडकवासला धरणात 4 दिवसांत तब्बल तीन महिन्यांचा पाणीसाठा; जाणून घ्या प. महाराष्ट्रातील ‘या’ 28 धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (TMC मध्ये)

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न रॅकेट प्रकरणी ‘शर्लिन -पूनम’ यांना हायकोर्टाचा दिलासा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Shrimant Dagdusheth Halwai Ganpati is now in a very different form; Crowd of devotees for darshan on the occasion of Angarki Chaturthi since morning

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update