Pune News : …म्हणून जम्बो कोविड हॉस्पीटलमधील कंत्राटी नर्सेस आणि कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून केलं आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील जम्बो कोविड मधील सर्व कंञाटी नर्सेस व स्टाफ मागील 3 महिने पगार मिळाला नाही म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणाऱ्या कंञाटी नर्सेसना गेली तीन महिने पगार दिले गेले नाहीत या सर्वांना कामावर घेताना एक पगार सांगितला गेला आणि प्रत्यक्ष हातात माञ निम्यापेक्षाही कमी पगार दिला गेलाय.म्हणूनच या नर्सेसनं जम्बो कोविड बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केल आहे.

येथील स्टाफ ने अधिक माहिती देताना सांगितले कि सांगतात 35 हजार पगार सांगितला गेला, परंतू देताना फक्त 16 हजार पगार देण्यात आला. मागील 3 महिन्या पासून तो ही पगार बंद करण्यात आला असून आम्हाला दिवाळी चा बोनस ही दिला गेला नाही. अशी माहिती दिली. जो पर्यंत पगार होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्या चा इशारा यावेळी त्यांनी दिला.

जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार करण्यासाठी 7.5 कोटी पीएमआरडीए जमा असून ही त्यांना पगार दिला जात नाही. ही बाब समोर येत आहे.