Pune News : लोककल्याणचा समाजसेवा हाच केंद्रबिंदू – वसेकरमहाराज

पुणे : कांदा, मुळा, भाजी | अवघी विठाबाई माझी || शेतीत कष्ट करुन विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या संत सावता महाराजांप्रमाणेच लोककल्याण प्रतिष्ठानचे संस्थापक राजाभाऊ होले व त्यांचे सहकारी समाजसेवा करीत आहेत. समाजसेवा हा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून त्यांची कार्यप्रणाली सुरू आहे, असे मत संत सावता माळी यांचे १६ वे वंशज रमेश वसेकर महाराज यांनी व्यक्त केले.

तुकाई दर्शन येथे लोककल्याण प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन रमेश वसेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी, सचिव विनोद सातव, कोषाध्यक्ष प्रदिप जगताप, फुरसुंगी महिला आघाडी संघटक सविता ढवळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख शादाब मुलाणी, पांडुरंग शेंडे, प्रविण होले, अथर्व सातव, सुयोग भुजबळ, धीरज गायकवाड, ओम राऊत, सूरज वचकल, सतिश धोत्रे, युवराज जाधव, सचिन भिसे, दिनेश टकसाळे, वर्षा शेंडे, वैशाली होले, योगिता पालिवाल, रुपाली होले उपस्थित होते.