Pune News | शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : Pune News | शिवणे इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय भोर (Sanjay Bhor) आणि नगरसेविका वृषालीताई चौधरी (Corporator Vrushali Chaudhary) यांच्या पुढाकाराने आयोजित कोविड 19 च्या विशेष लसीकरण मोहिमेला (Covid-19 special vaccination campaign) बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे सव्वा दोनशेहून अधिक कर्मचारी व नागरिकांनी या सुविधेचा लाभ (Pune News) घेतला.

शिवणे (shivane pune) येथील दांगट इंडस्ट्रियल इस्टेटमधील भोर इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी सकाळपासून कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. भोर इंडस्ट्रीजचे संचालक शुभम भोर व त्यांचे सहकारी या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. या शिबिरासाठी महापालिकेच्या वतीने कोव्हिशिल्ड लसीचे डोस उपलब्ध करून दिले होते.

कोव्हिड पासून सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे गरजेचे आहे, हे ओळखून शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या अशाच शिबिरातही अडीचशेहून अधिक कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते, असे असोसिएशनचे अध्यक्ष संजय भोर यांनी सांगितले.

कोव्हिड विरोधातील या लढ्यात असोसिएशनचे सक्रीयपणे आपला सहभाग नोंदविला असून यापूर्वीही रॅपिड
अँटिजेन टेस्ट व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परिसरातील उद्योजकांचेही त्यासाठी मोलाचे सहकार्य होत असल्याचे भोर यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, वकिलाला अटक

Rajiv Gandhi Science City Pimpri | पिंपरी चिंचवडमध्ये साकारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी, राज्य सरकारचा निर्णय

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Spontaneous response to the Sewing Industrial Association’s vaccination campaign

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update