Pune News : राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक पैकेज जाहीर करावे : दिपाली ढुमाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता कमल हसन यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे. यात सत्तेवर आल्यावर घरातील स्त्रियांना वेतन सुरु करु असे घोषित केले आहे. हे स्वागतार्ह आहे. परंतु अशी फक्त घोषणा न होता यावर अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. याच प्रमाणे राज्य सरकारने ही महाराष्ट्रातील महिलांनसाठी आर्थिक पैकेज घोषित करावे. अशी मागणी पुणे महानगरपालिके च्या विरोधी पक्ष नेता दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

पुढे बोलताना दिपाली धुमाळ म्हणाल्या की महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. परंतु त्यांना घरातील ही जवाबदारी व्यवस्थित पार पाडावी लागते. त्याचप्रमाणे जरी महिला कामा साठी बाहेर पडत नसल्या तरी त्या दिवसभर आपल घर उत्तमरित्या संभाळतात. यासाठी त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. बर्याच घरांन मध्ये महिलांना हिन वागणूक दिली जाते. महिला सुशिक्षित असून ही तीला कामासाठी बाहेर पडू दिले जात नाही. या महिलांची मनात खुप घुसमट होते. अश्यावेळी जर महिलांना आर्थिक आधार असेल तर त्या स्वतः साठी काही तरी करु शकतील. आमच्या पक्षा मध्ये सुध्दा महिला सन्मानासाठी 50% आरक्षण दिले आहे. त्याच प्रमाणे राज्यसरकार ने ही महिला सबलीकरणासाठी साठी आर्थिक पैकेज सुरु करावे.