Pune News | पुण्यात रविवारी राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधू-वर पालक परिचय मेळावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील महात्मा बसवेश्वर वधू-वर सूचक केंद्राच्या (Mahatma Basaveshwar Vadhu-Var Suchak kendra) वतीने रविवारी (दि. 21) उच्चशिक्षित लिंगायत (Lingayat) वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. पुण्यातील (Pune News) सारस बागेजवळ असलेल्या वेदशास्त्रतेजक हॉलमध्ये 12 ते 4 या दरम्यान या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लिंगायत धर्मातील सर्व पोटजातींसाठी वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब शेगावे (Appasaheb Shegave) यांनी दिली आहे.

 

 

 

 

महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लिंगायत समजातील अनेक मुलं-मुली नोकरीनिमित्त पुण्यात (Pune News) आहेत. त्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी पुण्यात वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निशा बिडवे आणि ज्येष्ठ पत्रकार नंदिनी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे राजेंद्र आलमखाने (महात्मा बसवेश्वर नाट्य निर्माता), आप्पासाहेब वाले (अध्यक्ष माळी समाज पुणे) यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रमात मागील वर्षातील वधु-वर संग्रह पुस्तिका भेट देण्यात येणार आहे.

 

 

– उमेदवारांनी फोटो व बायोडाटा आणणे बंधनकारक आहे.

– Online नोंदणी करणे आवश्यक आहे.

– या संस्थेच्या वतीने सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बेळगांव इत्यादी ठिकाणी मेळावा होणार असून याचा फायदा नोंद वधु-वर यांना होणार आहे.

– सदर मेळाव्यात जास्तीत जास्त वधु-वर सहभागी होऊन नोंदणी करण्याचे आवाहन आप्पासाहेब शेगावे संस्थेच्या कार्याध्यक्षा प्रियांका शेगावे, कार्यवाह राकेश तामगावे, उत्तम तोडकर यांनी केले आहे.

 

मेळाव्याचा पत्ता

वेदशास्त्रतेजक सभा, 2046 सदाशिव पेठ, सारस बागेजवळ, हॉटेल कल्पना विश्व चौक, पुणे 30.

 

Web Title :- Pune News | State level highly educated Lingayat bride to be parents meet in Pune on Sunday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा