Pune News : दापोडी गणेशनगर येथील हुतात्मा भाई कोतवाल उड्डाणपुलावरील रस्त्याचं डांबरीकरण करण्यासंदर्भात मनसेचं निवेदन !
Pune
Share
पोलासनामा ऑनलाईन – दापोडीतील गणेश नगर व पुणे मुंबई हायवेला जोडणारा भाई कोतवाल उड्डाणपुलाच्या वळण असलेल्या भागावरील रस्त्यांवरील डांबर निघून गेल्यामुळे रस्ता पूर्णपणे अपघातास निमंत्रण देणारा असा झालेला आहे, तेथे चढ व लगेच उतार असल्यामुळे वाहनाचा वेग जास्त असतो, त्यामुळे रस्त्यावर असलेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने अनेक लहान मोठे अपघात होत आहेत त्या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण पालिकेने करावं यासाठी मनसे उप विभाग अध्यक्ष अलेक्स अप्पा मोझेस, दिलीप ठोंबरे यांनी वॉर्ड अध्यक्ष सागर भोकरे, सामाजिक कार्यकर्ते भिम मुळे, प्रशांत सांगळे, मनसे सैनिक सतीश मात्मार्थी, पंकज ओव्हाळ यांच्यासह सहाय्यक आयुक्त हरळ (‘ह’ प्रभाग, कासारवाडी, पुणे) यांना भेटून निवेदन दिले. यानंतर त्यांच्यात चर्चाही झाली आणि त्यांनी काम करण्याचं आश्वासनही दिलं.