Pune News : हडपसरमधील साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा

पुणे : माणसाला आनंदी व उत्तम जीवन जगण्यासाठी पैसे, संपत्ती, अधिकार यापेक्षा निरोगी आरोग्य लाभणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि व्यसनांपासून दूर राहणे ही काळाची गरज आहे, असे मत प्राचार्य विजय शितोळे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या हडपसरमधील साधना विद्यालयात अमली पदार्थ विरोधी व तंबाखू मुक्त दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रतापराव गायकवाड यांनी विद्यार्थी व सर्व उपस्थितांना व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ दिली. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, दिलीप क्षीरसागर, शिवाजी मोहिते, आरोग्य विभागप्रमुख सुभाष केंगले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

इतिहास शिक्षिका सारिका टिळेकर म्हणाल्या की, स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणारे नरवीर तानाजी मालुसरे यांचा 4 फेब्रुवारी हा स्मृतिदिन असतो. यानिमित्ताने तानाजी मालुसरे यांच्या ऐतिहासिक कामगिरीला उजाळा दिला. त्यांचा ज्वलंत इतिहास मुलांसमोर मांडला आणि तानाजी मालुसरे यांचा आदर्श घेऊन जीवन जगायला शिकले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कलाशिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील पोवाडे सादर केले.

पर्यवेक्षक प्रल्हाद पवार यांनी प्रास्ताविक केले. अनिल वाव्हळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रतापराव गायकवाड यांनी आभार मानले.