Pune News | कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या दिवाळी फराळ स्पर्धेत पाचोरकर, नलावडे विजयी

पुणे – Pune News | कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या (success square kothrud) वतीने आयोजित दिवाळी फराळ स्पर्धेत मंगल पाचोरकर यांच्या चकलीने तर कविता नलावडे यांचा बेसन लाडूने बाजी मारली. तर किल्ले बनवा स्पर्धेत रेय़ांश, अक्षय व मृणाल नलावडे यांची कलाकृती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली (Pune News) आहे.

मेधा काजळे यांची चकली तर तपस्या महेश यांनी सादर केलेल्या मुरक्कूलाही परीक्षकांनी विशेष दाद दिली असून त्यांच्या पाककृतीही विशेष पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत.

मधुवंती आणि लक्ष्मीनारायण या जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकसनातून सक्सेस स्क्वेअर सोसायटी (success square kothrud) तयार झाली आहे.
सोसायटीची ही पहिलीच दिवाळी असल्याने संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ व किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि. ३ नोव्हेंबर) सायंकाळी अत्यंत उत्साही वातावरणात या स्पर्धा पार पडल्या.
इमारतीच्या टेरेसवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला.

कोथरुड येथील मेणकर फू़ड्सचे संचालक अभिताभ मेणकर आणि भारती विद्यापीठाच्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या प्रा. अवंती होदलूर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
विविध पाककृतीबाबतची निरीक्षणे नोंदविताना काही महत्त्वाच्या टिप्सही प्रा. होदलूर यांनी यावेळी दिल्या.
सर्व स्पर्धकांच्या प्रेंझेटेशन कौशल्यालाही त्यांनी दाद दिली.

संस्थेचे अध्यक्ष नागेश नलावडे, सदस्य एल. एन. कुलकर्णी व श्रीकांत गुर्जर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही यावेळी दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
संस्थेचे सचिव प्रदीप काजळे (Pune News) यांनी आभार मानले.

हे देखील वाचा

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा दरमहा केवळ ‘इतक्या’ रुपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळतील 1 कोटीपेक्षा जास्त रुपये; जाणून घ्या

Central Government Employees | लाखो सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना मिळणारी ‘ही’ सुविधा 8 नोव्हेंबरपासून बंद; जाणून घ्या नवीन नियमावली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | success square kothrud Program Diwali 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update