Pune News | जीममध्ये व्यायाम करताना पुण्यातील 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कुस्तीगीर आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | व्यायाम करताना अचानक मृत्यू होण्यामागे वैद्यकीय तपासणीचा (Medical Examination) अभाव, व्यायामाचा (Exercise) अतिरेक तसेच शरीर सुडौल करण्यासाठीचे सप्लिमेंटरी फूड (Supplementary Food) हीच कारणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे (Medical Experts) मत आहे. वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय व्यायाम सुरु करुन नेये, असे तज्ज्ञ सांगतात. (Pune News)

 

पुण्यातील पुनावळे (Punawale) येथे मंगळवारी (दि.16) सकाळी जीममध्ये व्यायाम करत असताना अनमोल गोजा (Anmol Goja) या 23 वर्षाच्या तरुणाचा अचानक मृत्यू (Death) झाला. यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. खाताना आपण पचेल तेवढेच खातो, मग व्यायाम करताना शरीराचा (Body) विचार न करता अतिरेक का केला जातो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे आणि व्यायाम मार्गदर्शकांचे (Exercise Guides) म्हणणे आहे. जुने कुस्तीगीर (Wrestler) हे रोज हजारपेक्षा अधिक जास्त जोर बैठका मारायचे, पण या व्यायामाला शिस्त असायची, असे जुने कुस्तीगीर वस्ताद यांनी सांगितले. जोर लावताना आपण आपले वजन पुढे नेतो, बैठका मारताना ते वर आणतो, त्यामुळे त्याचा त्रास होत नसल्याचे वस्तात सांगतात. (Pune News)

 

कुस्तीगीर अप्पा रेणुसे (Wrestler Appa Renuse) सांगतात, व्यायामाला शिस्त पाहिजे. तसेच सध्या मसल्स (Muscles) वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पावडरी दिल्या जातात. हे शरीरासाठी घातक आहे. यामुळे शरीरात वेगवेगळे अनैसर्गिक बदल (Unnatural Change) होतात व त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारच्या घटना घडतात. कोणताही व्यायाम करताना मार्गदर्शकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

कुस्तीचे राष्ट्रीय मार्गदर्शक विलास कथुरे (Vilas Kathure) यांनी सांगितले की, व्यायाम करण्यापूर्वी शरीराला आधी तयार केले पाहिजे. वॉर्मअप (Warmup) करावे लागते. थेट पळणे किंवा वजन उचलणे अशा गोष्टी केल्या जातात. कोणताही सराव नसताना अचानक व्यायाम सुरु केला जाते. हे शरीराला त्रासदायक ठरते. त्याचा अतिरेक झाला तर अशा घटना घडतात.

जनरल फिजिशियन डॉ. कल्याण गंगवाल (General Physician Dr. Kalyan Gangwal) यांनी सांगितले की,
व्यायाम सुरु करण्यापूर्वी तरुणांनी आणि चाळीशीनंतरच्या सर्वांनी वैद्यकीय तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.
हृदयासंबंधी (Heart) वरुन काहीच दिसून येत नसल्याने याचा त्रास होत नाही.
परंतु व्यायामाने त्यावर ताण आला की ते मग जगण्याची संधी देखील देत नाहीत.
मद्यपान (Alcohol), धूम्रपान (Smoking) करणाऱ्या लोकांचे शरीर आगोदरच नाजूक झालेले असते.
त्यामुळे अशा लोकांनी व्यायाम सुरु करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे.

 

Web Title :- Pune News | sudden-death-while-exercising-medical-experts-Wrestler Appa Renuse-Vilas Kathure-General Physician Dr. Kalyan Gangwal-say-reasons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मित्रच बनला वैरी, दगडाने ठेचून एकाचा खून ! आरोपी शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात

 

Thigh Fat Exercises | मांड्यांची चरबी कमी करण्यासह त्यांना आकारात आणण्यासाठी उत्तम आहेत ‘हे’ 3 व्यायाम; जाणून घ्या

 

Pravin Darekar | प्रवीण दरेकरांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा ! कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश