Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हुड्यांतील ५० हजार रुपये न दिल्याने छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना चंदननगर परिसरात घडली. निकीता पवार (वय 21) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती योगेश पवार, दीर रमेश पवार, सुनील पवार सासू विमल व सासरा रमेश यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुलीचे वडिल विनायक राठोड (वय ५०, रा. पिंपळगाव, परभणी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर योगेश व निकीता चंदननगर येेेथील प्रीतनगर सोसायटीत राहत होते. लग्नातील हुंड्याचे ५० हजार रूपये न दिल्याने योगेश यांच्यासह दोन दीर सासू-सासरे निकीताचा छळ करीत होते. किरकोळ कारणांवरून मानसिक त्रास देत होते. त्यामुळे त्रासाला कंटाळून निकीताने २ मार्चला राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.