Pune News : साधना विद्यालयाच्या सुमित भालके यांची उत्तराखंडमध्ये असिस्टंट कमांडंट पोलीसपदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामध्ये बालवाडी ते इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुमित सुनिलदत्त भालके यांची उत्तराखंड येथे असिस्टंट कमांडंट ऑफ पोलीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षा घेतली होती, त्या परीक्षेतून भालके यांची निवड झाली आहे. त्यांचा साधना विद्यालयाचे प्राचार्य विजय शितोळे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

शितोळे म्हणाले की, सुमित भालके साधना विद्यालयाचे 2009 च्या 10 वीच्या बॅचचे विद्यार्थी असून, गुणी आणि अभ्यासू विद्यार्थी अशी त्यांची ओळख आहे. सुमितचे वडिल सुनिलदत्त भालके मुख्याध्यापक असून, आई गृहिणी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील सुमित भालके यांनी जिद्द, मेहनत आणि अभ्यासाच्या बळावर यशाचं शिखर गाठून आईवडील आणि साधना विद्यालयाच्या लौकिकामध्ये त्याने भरच घातली आहे, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पर्यवेक्षक प्रल्हाद पवार, शिवाजी मोहिते, दिलीप क्षीरसागर, रयत बॅंकेचे व्हाईस चेअरमन लालासाहेब खलाटे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल, सुमित भालके यांचे वडील मुख्याध्यापक सुनिलदत्त भालके, आई समता भालके, माजी विद्यार्थी अक्षय येबाजी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अनिल वाव्हळ यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक प्रल्हाद पवार यांनी आभार मानले.