Pune News | बैलाचा 20 वर्ष केला सांभाळ ! निधन झाल्यावर शेतकऱ्याने केले असे काही की, तुम्ही कराल सलाम…!

पुणे : Pune News | शेतकऱ्याचे आणि बैलाच नात हे वडील आणि मुलाप्रमाणे असल्याचे आपण अनेकदा पाहतो. कारण शेतकरी देखील त्याला मुला प्रमाणे जीव लावत असतो. कारण शेतकऱ्याचे शेती कसण्याचे काम बैलच करत असतो. मात्र बैल त्याला सोडून जातो तेव्हा शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. बैलाने केलेल्या कष्टाचे परतफेड करायची कशी असा.अनेकदा प्रश्न पडतो. मात्र भोर तालुक्यातील एका शेतकऱ्याने बैलाचा चक्क तेरावा घातला आहे. या तेराव्याच्या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होता. (Pune News)

भोर तालुक्यातील (Bhor Taluka) कान्हावडी गावचे शेतकरी गणेश मरगजे. यांनी त्यांच्याकडे असलेल्या बैलाचा गेली ३० वर्ष स्वतच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. त्या बैलाचे नाव कैलास असे होते.अगदी मुलाप्रमाणे हे शेतकरी त्याचा सांभाळ करत असत. २००२ मध्ये त्यांनी हा बैल विकत घेतला होता. मानवी प्रथेप्रमाणे त्यांनी या बैलाचे सर्व विधी पार पाडले. मात्र बैल वृद्ध झाल्याने त्याचे २८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्या बैलाच्या उपकाराची परत फेड कशी करावी या उद्देशाने मरगजे यांनी त्या बैलाचा तेराव्याचा कार्यक्रम घालण्याचे ठरवले. (Pune News)

त्यांनी घरातील सदस्य गेल्या प्रमाणे त्यांनी त्याचा ते विधी करण्याचे ठरवले. या दिवशी विधिवत पूजा करून संपूर्ण गावाला तेराव्याचं जेवण घालण्यात आलं. या तेरावा विधीसाठी पंचक्रोशीतील शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होता. त्यामुळे सद्या शेतकरी आणि त्यांच्या बैलाच्या घातलेल्या तेराव्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

कैलास याचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर गणेश मरगजे यांना धक्का बसला होता.
मात्र त्यातून सावरत शेतकऱ्याने त्याचे सर्व विधी मानवी परंपरेप्रमाणे केले.
त्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम घालून शेतकरी आणि बैलाच नात हे अतूट असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
या घटनेने त्यांची चर्चा सद्या पंचक्रोशीत सुरू आहे.
अनेकजण शेतकऱ्याचे कौतुक करत असल्याचे पहायला मिळत आहे.
महिलांनी देखील त्यांची विधिवत पूजा करत त्याच्या आत्म्याला शांती मिळण्याची प्रार्थना केली आहे.

Web Title : Pune News | Take care of the bull for 20 years! Something that the farmer did after his death, you will salute…!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Popatrao Gawade | राष्ट्रवादीचे माजी आमदार, शरद पवारांचे निकटवर्तीय पोपटराव गावडे रूबी हॉलमध्ये दाखल, उपचार सुरू

Salman Khan | अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षितेत वाढ