Pune News | सह दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करा, प्रदेश युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | सब रजिस्ट्रार कार्यालयातील (Sub Registrar Office) हवेली क्रमांक 9 मधील शासकीय रेकॉर्ड गेल्या पंधरा दिवसापासून बेवारसपणे ऑफिसच्या बाहेर (Pune News) ठेवले आहे. हे अत्यंत चुकीचे असून सह दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण (Hanumant Chavan) यांच्या वरती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस (State Congress Youth General Secretary) रोहन सुरवसे पाटील (Rohan Suravse Patil) यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले, सह दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रॉपर्टीचे कागदपत्रे (Property Document) हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याचे जतन करण्याची जबाबदारी सह दुय्यम निबंधकाचे असते. कारण हे जनतेच्या खाजगी प्रॉपर्टीचे कागदपत्रे असतात. शिवाय हे शासनाच्या देखरेख खाली जपावे लागतात. असे असताना गेल्या पंधरा दिवसापासून शासकीय रेकॉर्ड बेवारसपणे ऑफिसच्या बाहेर ठेवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. (Pune News)

6 आणि 7 मार्चला पुण्यामध्ये अवकाळी पाऊस (Pune Unseasonal Rain) झाला या पावसात दस्त भिजले असू शकतात? असे जर झाले असेल तर याची सर्वस्वी जबाबदारी सह दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांची आहे. सदर कागदपत्रांमध्ये नागरिकांचे 1991 ते 2001 चे ओरिजनल दस्त आहेत. हे जर गहाळ झाले तर शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

यामुळेच सह दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांची कसून चौकशी करून त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई
(Disciplinary Action) करण्यात यावी अशी मागणी करीत असल्याचे प्रदेश
काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
तर या संदर्भातील निवेदन श्रवण हर्डीकर (Shravan Hardikar) यांच्याकडे सादर करीत असल्याचे सांगितले.

Web Title : Pune News | Take strict action against joint sub-registrar Hanumant Chavan, state youth general secretary Rohan Suravse Patil demands

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Devendra Fadnavis | म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन