Pune News | दीपावलीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री (MoS) डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी आरोग्य विभागाच्या (Health Department) कामाचा आढावा घेतला. पुणे जिल्ह्यातील (Pune News) आरोग्य यंत्रणेच्या विभागाच्या अडचणी समजावून घेत त्याबाबत सूचना केल्या. पुणे शहर (Pune News ) व पुणे ग्रामीणमध्ये (Rural) लसीकरण (Vaccination) आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लसीकरण कसे पोहोचता येईल याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश डॉ. भारती पवार यांनी दिले.

 

पुणे जिल्ह्यातील (Pune News) ऑक्सिजन प्लॅन्टचे सद्य स्थिती, औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही, आयुष्यमान भारत योजनेचा (ayushman bharat yojana) आढावा. लसींचा पुरवठा, लिक्विड मेडिकल प्लांट, कोरोना बाधित रुग्णांची संख्या, कोरोना बाधित, म्युकरमायकॉसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारी इंजेक्शन, औषधे होणाऱ्या उपचारासाठी लागणारा खर्च, उपचार करून बरे झालेली रुग्णसंख्या याविषयी माहिती डॉ. भारती पवार यांनी घेतली. तसेच दिवाळीच्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत, येणारी तिसरी संभाव्य लाट कशी रोखता येईल व गरज पडल्यास आपली आरोग्य यंत्रणेची काय तयारी आहे याचीही माहिती घेऊन त्यासाठी सूचना केल्या.

तसेच अन्नभेसळ ही मोठी समस्या असल्याने अन्नभेसळ रोखण्यासाठी सॅम्पल टेस्टिंग लॅबची काय परिस्थिती (Pune Crime) आहे. त्याचा रिपोर्ट किती दिवसात येतो आणि त्याचे रिपोर्ट जर उशिरा येत असतील तर त्यासाठी कामाचा आवाका वाढून त्या जलदगतीने कराव्यात, येणारा दीपावली सण बघता बनावट, भेसळ खाद्यतेल, मावा मोठ्या प्रमाणात येतो त्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. मिठाई दुकानांमध्ये तयार होत असलेल्या मिठाईच्या पदार्थांचे नमुने घेऊन त्यातील भेसळ करणाऱ्या दुकानांवर त्यांचे परवाने रद्द करून संबंधित मालकांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश व सूचना डॉ.भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

 

यावेळी भाजपा (BJP) शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), पुणे जिल्हासरचिटणीस राजेश पांडे (Rajesh Pandey),आरोग्य विभागाचे डॉ. देशमुख ,डॉ. देसाई, डॉ. वर्षा फडोल, फूड अँड ड्रगचे उपायुक्त दिनेश खिवनसरा, बी एम. ठाकूर भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळंबकर (Ganesh Kalambakar), शासकीय अधिकारी, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune News | Take strict measures to prevent adulteration on the backdrop of Diwali! Union Minister of State Dr. Bharti Pawar Orders

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात भाईगिरी ! जेलमध्ये असतानाची हप्ता वसुली बुडाली; कारागृहातून बाहेर आल्यानंतर पान टपरी चालकाच्या खूनाचा प्रयत्न

Pune Crime | ‘गेम केल्याशिवाय चप्पल न घालण्याची शपथ’ ! पुण्याच्या डुक्कर खिंडीत बिल्डरवर गोळीबार करणार्‍याला करमाळ्यावरुन अटक

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकतात एकाचवेळी 3 गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या नवीन अपडेट