Pune News | फ्लॅटधारकास मिळणार पार्किंगचा ताबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | फ्लॅट घेताना करारानुसार (Agreement) पार्किंग न मिळाल्याने फ्लॅट मालकाला ग्राहक आयोगाकडून (Consumer Commission) एक दिलासा (Pune News) देण्यात आला आहे. संबंधित फ्लॅटधारकाला करारात ठरल्याप्रमाणे पार्किंगचा ताबा देण्यात यावा, असा आदेश आयोगाकडून विकसकाला देण्यात आला आहे.

 

हेमंत जगताप (Hemant Jagtap) आणि ज्योती जगताप (Jyoti Jagtap) यांनी व्ही. एम. ग्रुपचे विजय तापडिया (Vijay Tapadia) यांच्याविरोधात आयोगात तक्रार दाखल करण्यात आली होती. जगताप दांपत्याने ग्रुपच्या आंबेगावमधील एका प्रकल्पात 32 लाख 49 हजार रुपयांचा फ्लॅट बुक केला होता. दिलेल्या किंमतीत त्यांना पार्किंग देण्यात येईल, असा करार त्यांच्यात झाला होता. दरम्यान, अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख (J. V. Deshmukh), सदस्य अनिल जवळेकर (Anil Javalekar) आणि शुभांगी दुनाखे (Shubhangi Dunakhe) यांनी याबाबत निकाल दिला आहे. (Pune News)

निकालात सांगितलं आहे की, प्रत्यक्षात फ्लॅटचा ताबा देताना त्यांना पार्किंग आणि फ्लॅटच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नाही.
त्यामुळे जगताप यांनी ग्रुप विरोधात पोलिसांत आणि आयोगात तक्रार दाखल केली.
तर, आयोगात जगताप यांच्यावतीने ॲड. ज्ञानराज संत (Adv. Dyanraj Sant) आणि ॲड. जयश्री कुलकर्णी (Adv. Jayashree Kulkarni) यांनी युक्तिवाद केला आहे.
पार्किंग न मिळाल्याने झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये, 50 हजार रुपये तक्रारीचा खर्च तसेच पार्किंगची जागा न मिळाल्याने 5 लाख रुपये मिळावी, अशी मागणी जगताप यांच्याकडून करण्यात आली होती.

 

दरम्यान, विकसकाने निकाल झाल्यापासून 45 दिवसांच्या आत जगताप यांना कार पार्किंगचा ताबा द्यावा.
त्याचबरोबर पार्किंग न दिल्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल पंधरा हजार रुपये, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल दहा हजार रुपये आणि तक्रार खर्च म्हणून 5 हजार रुपये देण्याचे आदेश आगोयाकडून देण्यात आले आहेत.

 

Web Title :- Pune News | tenant will get possession of the parking lot Consumer Commission Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा