Pune News | अतिक्रमण कारवाई रोखण्यासाठी मुलालाच इमारतीत डांबले; शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील खळबळजनक प्रकार

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | शिरूर (Shirur) तालुक्याच्या कान्हूर मेसाई (Kanhur Mesai) येथील अतिक्रमण मध्ये असलेल्या इमारतीवर कारवाई होत असताना कारवाई टाळण्यासाठी एका इसमाने आपल्या मुलाला इमारतीमधील एका गाळ्यामध्ये डांबून, गट विकास अधिकाऱ्यांनी मुलाला डांबले असल्याचा आरोप केल्याची घटना घडली.
शिक्रापूर पोलिसां (Shikrapur Police) नी सदर बारा वर्षीय मुलाची सुटका केली आहे.

कान्हूर मेसाई ता. शिरुर (Kanhur Mesai Ta. Shirur) येथील ग्रामपंचायत (Gram Panchayat) च्या जागेमध्ये काही इसमांनी इमारत बांधलेली असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शिरुर पंचायत समितीकडे अर्ज करत सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली,
दरम्यान सदर इमारत धारकांनी देखील न्यायलयात दावा दाखल केला.
मात्र सदर इमारतीची बाब न्यायप्रविष्ठ आहे.
परंतु शिरुर पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी यांनी सदर इमारतीतील गाळे धारकांना १७ जून रोजी ग्रामपंचायत मालकीच्या जागेतील गाळे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरु असून
जागेची हद्द निछिती व मोजणी होईपर्यंत तसेच न्यायालयाचा निकाल लागे पर्यंत सर्व गाळे बंद ठेवण्यात यावेत.
असे नोटीस दिलेआज १८ जून रोजी सकाळच्या सुमारास शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावाडे,

ग्रामविकास अधिकारी कुवरलाल घासले यांसह काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सदर इमारतीच्या ठिकाणी जात गाळे सील करण्याची प्रक्रिया सुरु करत तुकाराम गेनभाऊ भोकनळ यांच्या गाळ्याला सील करत शेजारील एक गाळा देखील सील केला.
यावेळी इमारतीतील गाळा धारक पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ झाला.
त्यामुळे गटविकास अधिकारी व इतर पदाधिकारी निघून गेले.
याचवेळी भोकनळ यांनी पाठीमागील बाजूने आपला बारा वर्षाचा मुलगा ओंकार याला आतमध्ये पाठवून गट विकास अधिकाऱ्यांनी मुलाला आतमध्ये कोंडून कारवाई करत गाळा सील केल्याचा आरोप केला.

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस हवालदार विजय चौधर, पोलीस शिपाई राकेश मळेकर,
होमगार्ड राजेंद्र पिंगळे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी करून परिस्थितीची माहिती घेत आतमध्ये असलेल्या मुलाला बाहेर काढले मात्र यावेळी ;
पोलिसांनी मुलाला बाहेर काढताच मुलाने घडलेला सर्व खरा प्रकार पोलिसांना सांगितला असता कारवाई टाळण्यासाठी मुलाच्या वडिलांनी मुलाला आतमध्ये ठेवले असल्याचे उघड झाले.

कान्हूर मेसाई येथे कारवाई करत गाळ्यांना अतिक्रमण बाबत कारवाई करण्याचे काम सुरु करत कुलूप लावून सील लावण्यात आलेले होते.
मात्र सध्या सदर गाळ्यांचा विषय न्यायालयात असल्याने न्यायालयाचा निकाल लागे पर्यंत कारवाई थांबण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे ग्रामविकास अधिकारी कुवरलाल घासले यांनी सांगितले आहे.

कान्हूर मेसाई येथील कारवाई ही ग्रामपंचायतचा वैयक्तिक वाद असून कारवाई दरम्यान मुलगा आतमध्ये नव्हता.
तेथे पंधरा वीस व्यक्ती समोर सर्व प्रकार झाला यावेळी दोन गटामध्ये वाद होऊ लागल्याने पोलीस संरक्षणात कारवाई करू या हेतूने मी निघून आलो.
असल्याचे शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावाडे यांनी सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Pune News | The boy was dragged into the building to
prevent encroachment; Incident takes place at Kanhur Mesai in Shirur taluka

हे देखील वाचा

Big Breaking News

पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरात ‘झूम बराबर झूम’ जोमात; पत्त्याच्या ‘क्लब’ आणि
‘मटका’ अड्ड्यावर गुन्हे शाखेचे रेड; 72 जणांवर कारवाई !

नेमकं काय आहे प्रकरण, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आता अवैध धंद्यांना
पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करणार का ?

‘त्या’ पोलिसांवर कारवाई होणार का?