ताज्या बातम्यापुणे

Pune News | बस चालवताना चालकाला आली फिट; प्रसंगावधान दाखवत पुण्यातील महिलेनं घेतलं स्टेअरिंग हाती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | गाडीमधून जात असताना अचानक चालकाला फिट आल्याने चालक (Driver) खाली पडला. त्यावेळी त्याचे डोळे पांढरे झाले, हात पायही वाकडे झाले, अशी परिस्थिती पाहून संबधित बसमधील महिला पुर्णपणे घाबरल्या. अशा घबराट परिस्थितीत काय करावे कुणाला समजेना. या प्रंसगात एका महिलेने धाडस दाखवत स्वतः बस चालवत चालकाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी, आणि बसमधील सर्व सहकारी महिलांना सुखरूप घरी पोहोचवण्याचे कोतुकास्पद आणि धैर्याचे काम केले आहे. योगिता धर्मेंद्र सातव (Yogita Dharmendra Satav) असे बस चालवणाा-या महिलेचे नाव आहे. (Pune News)

शिरूर तालुक्यातील (Shirur) मोराची चिंचोली याठिकाणी वाघोली येथील 22 ते 23 महिलांचा ग्रुप फिरण्यासाठी जात असताना असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अचानक घाबरण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने योगिता सातव (Yogita Satav) यांनी ती परिस्थिती हाताळली आहे. त्यामुळे सातव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोराची चिंचोली येथून परतत असताना असा प्रकार घडल्याने योगिता सातव यांनी स्वतः गाडी चालवत पुढील गावापर्यंत बस चालवत आणली. तेथे ड्रायव्हरवर उपचार केला गेला. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरा ड्रायव्हरला बोलावून सर्व महिलांना साधारण 40 किलोमीटर वाघोलीपर्यंत (Wagholi) सोडण्यात आले. (Pune News)

दरम्यान, अत्यंत घबराटीच्या प्रसंगामध्ये धाडसीने पुढे येत चालक व गाडीतील सर्व महिलांना सुखरूप पुढच्या गावी पोहचवणा-या योगिता सातव यांचा सत्कार करण्यात आला आहे. वाघोली गावच्या माजी सरपंच जयश्री सातव-पाटील (Jayashree Satav-Patil) यांनी आपल्या सहलीच्या आयोजक आशा वाघमारे यांच्यासह योगिता सातव यांचा घरी जाऊन सत्कार करत त्यांचे कोतुक केले आहे. ”चारचाकी वाहने बहुतेक महिला चालवितात, पण परिस्थिती गंभीर असताना बस चालवण्याचे वाघोलीतील योगिता सातव यांनी मोठे धाडस दाखवले, तसेच चालकासह सर्व सहकारी महिलांचे प्राण वाचवले.” असं माजी सरपंच जयश्री सातव-पाटील म्हणाल्या.

Web Title : Pune News | the drivers health deteriorated while driving the bus the woman stopped steering the bus Yogita Dharmendra Satav

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी !
पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे,
‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये;
सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Back to top button