Pune News | स्मार्ट सिटीला वर्षाची मुदतवाढ म्हणजे भाजप सरकारचा आणखी एक जुमला – माजी आमदार मोहन जोशी

0
103
Pune News | The extension of the year to Smart City is another jumble of the BJP government - former MLA Mohan Joshi
Mohan Joshi-Girish Bapat

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | स्मार्ट सिटी प्रकल्पाला (Smart City Project) एक वर्षाची मुदतवाढ म्हणजे महापालिका (pune corporation) निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारने (BJP Governement) केलेला आणखी एक जुमला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (former mla mohan joshi) यांनी पुण्यात (Pune News) केली आहे.

मोदी सरकारने (Modi Government) गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना (Smart City Scheme) देशभरातच फसलेली आहे. ही योजना गुंडाळण्याच्या तयारीतच मोदी सरकार आहे. पण, आठ महिन्यानंतर महापालिका निवडणुका (pune corporation election) असल्याने तेव्हा योजना गुंडाळल्याचा बोभाटा होईल आणि हे प्रकरण भाजपच्या अंगाशी येईल यासाठी जून 2021 पासून योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देऊन सारवासारव केल्याचा आरोप आमदार जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

स्मार्ट सिटी योजनेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुण्यात झाले. परंतु, या पुण्यातच पाच वर्षांत योजनेचा बोजवारा उडाला.
औंध, बाणेर, बालेवाडी या विकसित भागाची निवड योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली.
या पहिल्या टप्प्यातही नागरिकांना फायदा होईल असा एकही प्रकल्प झाला नाही.
अनेक प्रकल्प अर्धवटच राहिले आहेत. अलिकडे तर पुणे स्मार्ट सिटीला देशपातळीवर स्पर्धेत पर्यावरण,
स्वच्छता, शहरी वाहतूक अशा कोणत्याही निकषावर स्थान मिळालेले नाही.
भाजपचे खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांनी पालकमंत्री असताना स्मार्ट सिटीच्या प्रशासनावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता.
त्यानंतर खासदार झाल्यावर केंद्र सरकारच्या योजनेत बापट (BJP MP Girish Bapat) सुधारणा करु शकलेले नाहीत.
याबाबत खुद्द भाजपमध्येच अनेक लोकं बापट यांच्यावर नाराज आहेत असे मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी पत्रकात म्हटले आहे.

पाच वर्षात काहीही प्रगती करु न शकलेली स्मार्ट सिटी योजना वर्षभराच्या मुदतवाढीत काही मोठा बदल करुन दाखवणार नाही.
मुदतवाढ म्हणजे मोदी सरकारचा आणखी एक जुमला आहे,
असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title :- Pune News | The extension of the year to Smart City is another jumble of the BJP government – former MLA Mohan Joshi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | हॉटेल ‘गारवा’चे मालक आखाडेंच्या खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास लातूर येथून अटक, लोणी काळभोर पोलिसांकडून आतापर्यंत 10 जण गजाआड

Pune-Bangalore Highway | पुणे-बेंगलोर महामार्गावर 3 फूट पाणी, महामार्ग अद्यापही बंदच; 40 तासापासून वाहतूक खोळंबली

Ration Card | खुशखबर ! रेशन कार्डधारकांना नोव्हेंबरपर्यंत फ्री ‘रेशन’शिवाय मिळतील अनेक मोठे फायदे, जाणून घ्या