Pune News | बिल्डरांच्या कार्यालयांतच सात हजारपेक्षा जास्त सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे नोंद; ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा फायदा

पुणे : Pune News | नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ‘ ई-रजिस्ट्रेशन’ (‘E-Registration’ of Registration and Stamp Duty Department) या सुविधे अंतर्गत बिल्डरांच्या कार्यालयातच सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे नोंद करण्यात येत आहेत. त्यानुसार गेल्या दोन वर्षांत सात हजार सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे बिल्डरांच्या कार्यालयात नोंद करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. सध्या राज्यातील १४६ बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले असून संबंधितांना मान्यता मिळाल्यास राज्यभरातील तब्बल एक लाख २७ हजार ५९५ सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे बिल्डरांच्या कार्यालयात नोंद होणार आहेत. (Pune News)

‘बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातच सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे नोंद करण्याच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत राज्यभरातून ४२३ बिल्डरांनी या सुविधेसाठी अर्ज केले. त्यापैकी ३६३ जणांचे अर्ज छाननीअंती मंजूर करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत सात हजारपेक्षा जास्त सदनिकांचे प्रथम करारनामे बिल्डरांच्या कार्यालयातच नोंद करण्यात आले. त्यामुळे संबंधित नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात येण्याची गरज भासली नाही, असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर (IAS Shravan Hardikar Pune IGR) यांनी सांगितले. (Pune News)

सध्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे राज्यभरातील १४६ बिल्डरांनी ई-रजिस्ट्रेशन अंतर्गत सदनिकांच्या प्रथम विक्री करारनाम्यांच्या नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात येत आहे. छाननीअंती हे अर्ज मंजूर झाल्यास आगामी काळात एक लाख २७ हजार ५९५ सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे संबंधित बिल्डरांच्या कार्यालयातच नोंद होऊ शकतील, असेही हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाकडे असलेल्या केंद्रामध्ये ऑनलाइन दस्त नोंदणी करण्यात आल्यानंतर संबंधित माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात येते. निबंधकांकडून कागदपत्रांची छाननी होऊन मंजुरी देण्यात येते. बांधकाम व्यावसायिक आणि दुय्यम निबंधक कार्यालय यांच्यामधील ही प्रक्रिया असल्याने नागरिकांसाठी दस्त नोंदणी सोपी झाली आहे.

बंधन उठवल्याचा फायदा

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मालमत्ता खरेदी-विक्रीला चालना देण्यासाठी आणि कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी होऊ नये म्हणून बांधकाम व्यावसायिकांना दस्त नोंदणी केंद्र सुरू
करण्याचे परवाने सन २०२० पासून देण्यात येत आहेत.
मात्र, सुरुवातीला सदनिकांच्या प्रथम विक्री करारनाम्याच्या नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशन प्रणालीअंतर्गत ५०० दस्तांची नोंद करण्याचे बंधन होते.
त्यामुळे मोठा गृहप्रकल्प असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनाच या सुविधेचा लाभ घेता येत होता.
ही बाब लक्षात घेऊन हे बंधन उठवण्यात आले आहे.
त्यामुळे आता कोणत्याही बांधकाम व्यावसायिकांना दस्त नोंदणी केंद्रासाठी परवाने दिले जात आहेत.

Web Title :- Pune News | The first sale contract of more than seven thousand flats was recorded in the offices of the builders; Advantage of e-registration system

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PFI Ban | शिंदे- फडणवीस सरकार रझा अकादमीवर बंदी घालण्याची शक्यता, केंद्राने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर राज्यात हालचाली

Pune Crime | हडपसर आणि येरवडा परिसरात अवैध धंद्यांना ऊत? गुन्हे शाखेकडून मटक्याच्या अड्डयांवर छापे, 20 जण ताब्यात

Chandrasekhar Bawankule | ‘अशोक चव्हाण यांनी जो दावा केला आहे त्याचा कट मातोश्रीवर शिजला असेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात