Pune News : कानून के हाथ बहुत लंबे होते हैं ! चोरटयांचा 30 KM पर्यंत 700 CCTV मधून काढला ‘माग’, 55 लाखांचे दागिने चोरणार्‍या अंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘कानून के हात लंबे होते है’ अस उगच म्हंटल जात नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून,  55 लाखांचे दागिने घेऊन पसार झालेल्या एका चोरट्याला पोलिसांनी 700 सीसीटीव्हीची पडताळणीकरून पकडले आहे. 31 डिसेंबरला रविवार पेठेत हा प्रकार घडला होता.

शंकर लक्ष्मण आचारी (वय 35) व  यादगीरी लक्ष्मण आचारी (वय 22, रा.भद्रावती, जि.शिमाेगा, कर्नाटक)  यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सराफी व्यवसायिक करण प्रदीप माळी (वय-35,रा.पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर आरोपींचे 2 साथीदार पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.

फिर्यादी हे सोने खरेदी व विक्री करतात. दरम्यान, त्यांनी 31 डिसेंबर रोजी 55 लाख रुपयांचे सोने खरेदी केले व ते रविवार पेठेत गेले. गाडी पार्क करून ते थांबले. त्यावेळी अल्पवयीन मुलगा आला आणि त्याने गाडीवर ऑइल टाकले. याचवेळी आरोपी त्याठिकाणी आले व त्यांनी ऑइल सांडले असल्याचे सांगत त्यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर इतर आरोपींनी त्यांच्या गाडीत ठेवलेले 55 लाख रुपयांचे सोने असलेली बॅग चोरून नेली होती. त्यानंतर याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली. यावेळी एका ठिकाणी संशयित प्रकार आढळला. त्यानुसार सीसीटीव्ही तपासले गेले. त्यात तीन संशयितांचा घटनास्थळापासून 30 किलाेमीटर अंतरावर म्हणजे जवळपास सासवड गावापर्यंत सुमारे 700 सीसीटीव्ही तपासात पाठलाग केेला. त्यात 3 जणांपैकी एक संशयित तेथील बांधकाम चालु असलेल्या घरात सापडला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता पोलिसांनी आंतरराज्यीय चाेरीचे गुन्हे करणारी टाेळी जेरबंद केली.

दरम्यान, या बांधकाम साईडवर असलेल्या मजुरांकडे चौकशी केली. त्यांचे मोबाईल तपासले. त्यात या आरोपींनी ही बॅग त्यांच्या कर्नाटक येथील साथीदारांकडे दिली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार फरासखाना पाेलीसांचे पथक कर्नाटकातील भद्रावती येथे गेले. त्यांनी आरोपी शंकर आचारी याला पकडले. त्याचेकडे सखाेल तपास केला असता त्याने त्याचे साथीदार श्रीनिवास व इतरांची नावे सांगितली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे व सहाय्यक आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे व पथकतील मोहन दळवी, सुदेश सपकाळ, सचिन सरपाले, मयूर भोकरे, तुषार खडके यांच्या पथकाने केली आहे. कर्नाटकातील टोळी इतर राज्यांमध्ये देखील सक्रिय

कर्नाटक राज्यातील टाेळी महाराष्ट्र व बाहेरील इतर राज्यात जावून तेथे लहान मुलांचे सहाय्याने गाडीवर ऑईल टाकून, अंगावर घाण टाकुन, खाज खुजली टाकून, गाडीची डीकी खाेलुन त्यातील बॅग व पैशांची चाेरी करणे, तसेच गर्दीचा फायदा घेवून साेने व पैसे चाेरी करणे, पाकीटे चाेरी करणे असे गुन्हे करत आहे. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र व इतर राज्यात जावून तेथे काही दिवस भाडयाने घर घेवून चाेऱ्या करुन ते दुसरीकडे जात असत अशी माहिती उपायुक्त नारनवरे व सहाय्यक पाेलीस टोणपे यांनी दिली.