Pune News | पुण्यामधील पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पुढील 4 वर्षांमध्ये पुर्ण करणार; सोमवारपासून सर्वेक्षण सुरु होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या पुण्यातील (Pune News) पाटील इस्टेट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा (Patil Estate Slum Rehabilitation Project) प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या झोपडीधारकांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन केले जाणार असून त्यांना आहे त्याच ठिकाणी 300 चौरसफूटांची घरे देण्यात येणार आहेत. तसेच हे काम पुढील चार वर्षात पुर्ण केले जाणार असून त्यासाठी झोपड्यांचे सर्वेक्षण (Survey) येत्या सोमवार (दि.25) पासून केले जाणार असल्याची (Pune News) माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाचे (SRA) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर (Chief Executive Officer Rajendra Nimbalkar) यांनी दिली.

 

पाटील इस्टेट झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती मिळावी यासाठी तेथील झोपडीधारक यांच्या मागणीनुसार सदर झोपडपट्टीमधील सुमारे 500 झोपडीधारकांची
एसआरएच्या वतीने शुक्रवारी (दि.22) बैठक घेण्यात आली. यावेळी निंबाळकर यांनी ही माहिती दिली.
हा प्रकल्प एसआरए आणि अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP) यांच्या वतीने संयुक्तपणे इच्छुक व सक्षम विकासकांकडून जाहीर खुल्या निविदा पद्धतीने राबविण्यात (Pune News) येणार आहे.

 

त्यानंतर या प्रकल्पाचे सर्व आराखडे पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण करुन जानेवारी 2022 मध्ये या निविदा प्रसिद्ध करुन विकासकास एप्रिल 2022 मध्ये कामाचे वर्क ऑर्डर
(Work order) देऊन साधारण पुढील 4 वर्षांमध्ये संपुर्ण प्रकल्पाचे काम पुर्ण करुन सर्व पात्र निवासी व बिगर-निवासी झोपडीधारकांना त्यांचे प्रत्येकी हक्काचे घर तसेच व्यावसायिक जागा
(Commercial space) त्यांचे आत्ताचे आहे त्या ठिकाणीच मोफत देण्याचे नियोजन (Pune News) करण्यात आले आहे.

 

या बैठकीत उपस्थितांना एसआरएच्या वतीने सादरीकरणाद्वारे पुनर्वसन प्रक्रिया, झोपडीधारकांची पात्रता व त्यासंबंधीचे आवश्यक पुरावे,
झोपडीधारकांना मिळणाऱ्या सोई-सुविधा,
प्रकल्प पुर्ण होण्याचा कालावधी इत्यादी बाबतची महिती देण्यात आली.
तसेच उपस्थित झोपडीधारकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.
दरम्यान सोमवार पासुन सर्वेक्षण कामास सुरुवात होणार असल्याने सर्व संबंधितांनी व विशेषत: झोपडीधारकांनी सहकार्य करावे
असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे.

 

Web Title : Pune News | The slum rehabilitation project at Patil Estate in Pune will be completed in the next 4 years; The survey will start from Monday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रीजवर सलग तिसऱ्या दिवशी अपघात ! ट्रकने 8 वाहनांना धडक दिल्याने दोन महिला जखमी (व्हिडिओ)

Pune Crime | न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; फोटो डिलिट करण्यासाठी मागितली 1.70 लाख रुपयांची खंडणी

Life Certificate | पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’; जाणून घ्या शेवटची तारीख आणि प्रोसेस?