Pune News | बिबवेवाडीमध्ये निघाला नाग; सर्प मित्राकडून जीवदान (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | बिबवेवाडी येथील प्रसाद बिबवे नगर या ठिकाणी सोमवारी दुपारी एक नाग आढळून आला. इंडियन स्पेक्टकल कोब्रा जातीचा हा नाग सर्पमित्रा च्या साह्याने रेस्क्यू करण्यात आला. त्याला सुखरूप कात्रज (Katraj) सर्पोद्यानामध्ये सुपूर्द करण्यात (Pune News) आले.

 

सर्पमित्र तुषार देवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद बिबवे नगरमध्ये विद्युत पोल वर काम सुरू होते. याठिकाणी असलेल्या डीपीचे काम महावितरणचे कर्मचारी करीत होते. हे काम करण्यासाठी ते गेले असता डीपी शेजारी असलेल्या एका बिळामधून नाग बाहेर येऊन बसल्याचे त्यांनी पाहिले.

 

 

याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सर्पमित्र तुषार देवडे यांच्याशी संपर्क साधला.
त्यानंतर देवडे यांनी घटनास्थळी जाऊन हा नाग पकडला. त्याला सुखरूप कात्रज सर्पोद्यानामध्ये पोचविले.
या भागामध्ये नाग निघण्याचे प्रमाण अधिक असून यापूर्वी देखील नाग सापडल्याचे त्यांनी नमूद केले.
या भागात नागांचा अधिवास असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली (Pune News) आहे.

 

Web Title :- Pune News | The snake went to Bibwewadi; Life from a Snake Friend (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | रिक्षात विसरली 3 लाखाची रोकड व 55 हजारांच्या साड्या; डेक्कन पोलिसांनी घेतला तात्काळ शोध

Russia Suspends Its Mission To NATO | रशियानं बंद केलं नाटोचं मिशन, NATO चं मॉस्कोमधील इनफॉर्मेशन ऑफिस होणार बंद !

Gold Price Today | सणासुदीच्या काळात वाढला सोन्याचा दर, तरीसुद्धा मिळतेय 9894 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर