Pune News : ‘लपाछपीच्या खेळात सतत राज्य माज्यावर देतो’, 11 वर्षाच्या विश्वजीतच्या खूनाचा पर्दाफाश, कोथरूड परिसरातील 13 वर्षीय मुलगा ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील कोथरुड परिसरात झालेल्या त्या 11 वर्षाच्या मुलाच्या खूनप्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांनी यश आले असून लपा छपीचा खेळ खेळताना सतत राज्य माज्यावर देतो, अश्या कारणावरून त्याचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विश्वजीत विनोद वंजारी (वय 11) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी 13 वर्षीच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी विश्वजीत याच्या आईने कोथरुड पोलीस तक्रार केली होती. त्यानुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्वजीत हा केळेवाडी परिसरात राहणारा आहे. त्याची आई धुणे भांडे कामे करते. तर वडील मिळेल ते काम करतात. तर आरोपी मुलगा देखील त्याच्या शेजारी राहणार आहे. तो दोघे दररोज एकत्र खेळत असत. त्यांचा लपाछपीचा खेळ असायचा.

दरम्यान विश्वजीत हा 29 जानेवारीला बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा शोध कोथरुड पोलीस घेत होते. यादरम्यान रविवारी दुपारी त्याचा मृतदेह केळेवाडी परिसरातच एका मोकळ्या जागेत मिळून आला. यावेळी त्याच्या डोक्यात मारहाण केली असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्याचा खून झाल्याचे समजताच परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी संशयित काहीजणांना पकडले होते. त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. यावेळी पोलिसांनी विश्वजीत याच्या त्या मित्राला ताब्यात घेऊन सखोल तपास केला. त्यावेळी त्याने खुनाची कबुली दिली. त्याने आम्ही लपाछपी खेळत असत. त्यावेळी तो सतत मला राज्य घेण्यास सांगत असे. त्याच्यावर राज्य आले तरी तो मलाच राज्य देत असे, याचा रागा होता. त्यावरून खून केल्याचे म्हटले आहे. दोघेही याठिकाणी खेळण्यास गेल्यानंतर चिडाचिडी झाली, त्यानंतर मी त्याला ढकलून दिले. त्यावेळी त्याच्या डोक्यातून रक्त निघाले. त्यावेळी घाबरून दगड घातला व माती टाकली असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.