Pune News | ‘ती’ची करून कहाणी ! पुण्यात वणवण फिरून काम न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न; पोलिस अन् अग्नीशमनच्या जवानांनी वाचवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | नवऱ्यासोबत भांडण झाल्याने तिने कर्नाटकातून थेट पुणे गाठले, पुण्यात आल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी तीन दिवस वणवण फिरून काम मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटी निराशा झाल्याने मुळा – मुठा नदीमध्ये (mula mutha river) उडी मारत आमहत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to Suicide) केला. सुदैवाने वेळीच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने महिलेचा जीव वाचवण्यात यश (Pune News) आले.

ही करून कहाणी आहे नागम्मा मलिक कांबळे या 50 वर्षीय महिलेची. त्या मूळच्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील कुरुळी गावच्या रहिवासी आहेत.
तीन दिवसांपूर्वी नागम्मा यांचे नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे कर्नाटक येथून पुणे येथे काम शोधण्याकरिता आल्या होत्या.
सलग तीन दिवस काम शोधूनही मिळाले नाही, तसेच कुटुंबासोबत झालेल्या भांडणाच्या निराशेमूळे त्यांनी जीव देण्याकरिता मुळा-मुठा नदी मध्ये जीव देण्यासाठी उडी मारली.

नागम्मा कांबळे या नदीतील पाण्यामध्ये वाहून जाताना पाहून स्थानिक नागरिकाने पर्णकुटी पोलिस चौकी (parnkuti police chowki) येथे माहिती सांगितली.
मिळालेल्या माहितीवरून चौकी प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगूळे (PSI Ravindrakumar Warangule) यांनी तात्काळ फायर ब्रिगेडशी
(pune fire brigade) संपर्क साधून त्यांना माहिती दिली.

 

येरवडा पोलीस स्टेशन (Yerwada Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख (Senior Police Inspector Yunus Shaikh)
यांना कळवून यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहून जाणाऱ्या महिलेला जीवाची पर्वा न करता फायर ब्रिगेडच्या मदतीने बाहेर काढून जीवदान दिले.
सदर कामगिरी पर्णकुटी पोलिस चौकी प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवींद्रकुमार वारंगुळे, पो ना पाटील, पो शी कांबळे, पो शी वाघुले आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी यांनी (Pune News) केली.

 

Web Title : Pune News | The story of ‘she’! Attempted suicide in Pune due to lack of work; Police and firefighters rescued him

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PAN Aadhaar Linking | सर्व PAN, Aadhaar कार्डधारकांसाठी आवश्यक ! तात्काळ करा ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान

Pune Police Crime Branch | पुण्यातील ‘न्यू रायजिंग गँग’चा म्होरक्या विशाल उर्फ जंगल्या सातपुतेसह तिघे गोत्यात, गुन्हे शाखेकडून कारवाई

Jayant patil | अजित पवार लपवण्यासारखं काही करत नाहीत (व्हिडीओ)