Pune News | अर्चना पाटील व तुषार पाटील यांचे काम बोलते – प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | विरोधक कितीही बोलले तरी अर्चना तुषार पाटील (Archana Tushar Patil) आणि तुषार पाटील यांचे काम बोलते. विरोधकांची चिंता तुम्ही करु नका. भरतीय जनता पार्टी (BJP) तुमच्या सोबत आहे. आज मी हेच सांगायला खास येथे (Pune News) आलो आहे. रचनात्मक कामामुळेच नागरिक तुमच्या पाठिशी असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe) यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र 19 च्या नगरसेविका व महिला शहराध्यक्ष अर्चना तुषार पाटील (corporator archana tushar patil) यांच्या संकल्पनेतुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चित्रसृष्टी लोकार्पण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शहराध्यक्ष जगदीश मुळीक (bjp city president jagdish mulik) यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. अर्चना पाटील आणि तुषार पाटील तुम्ही अण्णा भाऊ यांचा आदर्श घेऊन प्रभागाला आदर्श दिशा द्या. आता काम करा फेब्रुवारीत विरोधकांचा आपण करेक्ट कार्यक्रम करु.

अर्चना पाटील म्हणाल्या, मातंग समाजासाठी खस्ता खाणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट लोकासमोर आला पाहीजे. या उद्देशाने ही चित्रसृष्टी साकारण्यात आली आहे.

यावेळी समाजामध्ये उल्लेखनिय काम केलेल्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे (Former Minister Dilip Kamble), आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble), स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने
(standing committee chairman hemant rasane) ,
भिमराव साठे , रफिक शेख, विकी ढोले, सदा ढावरे, सुखदेव अडागळे,
महेश सकट , राणी कांबळे, रेश्मा सय्यद,
दत्ता जाधव, विकास सातारकर , लक्ष्मी पवार, संध्या पवार, छगन बुलाखे,
मुनावर रामपुरी, विजू चव्हाण, निलोफर शेख़ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांनी केले होते.
सुत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.

Web Title : Pune News | The work of Archana Patil and Tushar Patil speaks –
State President Chandrakant Patil

Anti Corruption Trap | 55,000 हजाराची लाच घेताना तहसीलदार आणि
संगणक ऑपरेटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Mumbai New Regulations | मुंबईत सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत सुरु राहणार,
नवी नियमावली जाहीर