Pune News | कोविड काळातही सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य कौतुकास्पद! वार्षिक सर्वसाधारण सभा व अभियांत्रिकी दिवस उत्साहात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | कोविड (Covid-19) काळात आयुष्याने सर्वांचीच परीक्षा घेतली. आणि या परीक्षेच्या काळात पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (college of engineering pune) माजी विद्यार्थी संघटनेने केलेले कार्य मोलाचं होतं, असे गौरवोद्गार पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) च्या माजी विद्यार्थी संघटनेच्या (सीओईपी अल्युमनी असोसिएशन – coep alumni association) नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील उपस्थित मान्यवरांनी (Pune News) काढले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन व ऑफलाईन ठेवण्यात आली होती. यावेळी अभियांत्रिकी दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राप्ती कर विभागाचे आयुक्त संग्राम गायकवाड, रजिस्ट्रेशन अण्ड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प विभागाचे महासंचालक श्रावण हर्डिकर, तेलंगाणा राज्यात कार्यरत असलेले पोलीस आयुक्त महेश भागवत, पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक बी बी अहुजा, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, सचिव सुजीत परदेशी, खजिनदार अंकिता चोरडिया-संचेती, सदस्य डॉ सुधीर आगाशे व डॉ श्रीनिवास महाजन आदी मान्यवर उपस्थित (Pune News) होते.

सर विश्वैश्वरय्या हे पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे सांगून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ बी बी अहुजा यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, माजी विद्यार्थी संघटनेने भरत गिते यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात खूप महत्वाचे व उपयुक्त अशी कामे केली. विशेषत: आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना केलेली मदत खास आहे. सध्याचे विद्यार्थीही खूप चांगले आहेत तेदेखील मागे नाहीत, असे गौरवोद्गार डॉ बी बी अहुजा यांनी (Pune News) काढले.

पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून गेली वर्षभर कोविड काळात काम करीत आहोत. विद्यार्थ्यांना मदत करताना महाविद्यालयासाठी अधिक काय करता येईल याचा विचार करून आम्ही काम केले. प्रत्येक कामातून महाविद्यालयाचे ब्रँडिंग करण्याचं प्रयत्न राहिला. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी काही तासांत लाखो रुपये जमा झाले. आणि ही गोष्ट मोठं समाधान देणारी ठरली. कोविड च्या या काळात अधिकाधिक कंपन्या व उद्योगांबरोबर ऑनलाइन संवादातून संपर्क साधला, असे मत पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते यांनी व्यक्त केले.

भारतीय प्रशासन सेवेत येऊन समाजासाठी व देशासाठी सर्वोत्तम काम करण्याची संधी मिळते. पूर्वीच्या काळी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना हे क्षेत्र फारसं माहिती नसायचे. परंतु, अलिकडच्या काळात अभियांत्रिकेचे अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. अभ्यासाची व्यवस्थित तयारी केली तर यश हमखास मिळते. खासगी क्षेत्रात चांगले कार्य केलेल्या व्यक्तींना प्रशासनात काम करण्याची संधी दिली जात आहे. यामधूनही चांगले कार्य केलेले अभियंते प्रशासकीय सेवेत येऊ शकतात. अविकसित भागाचा विकास करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग व्हायला हवा आणि यासाठी अभियांत्रिकेचे विद्यार्थी सर्वोत्तम योगदान देऊ शकतात, असे प्राप्ती कर विभागाचे आयुक्त संग्राम गायकवाड यांनी सांगितले.

कोविड काळात डॉक्टर, प्रशासन आणि संबंधितांनी केलेल्या कार्याचा गौरव सर्व स्तरातून झाला.
मात्र, अभियंत्याची कोणालाही आठवण झाली नाही. खरं तर, या महामारीच्या काळात लागणाऱ्या वस्तुंची निर्मिती अभियंत्यांनीच केली.
त्यामुळे अभियंते हेसुद्धा कोविड योद्धाच आहेत.
त्यांचा विसर पडू नये, अशी अपेक्षा रजिस्ट्रेशन अण्ड कंट्रोलर ऑफ स्टॅम्प विभागाचे महासंचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली.
कठोर परिश्रम करण्याची क्षमता अभियंत्यामध्ये असली पाहिजे. आजुबाजूला घडणाऱ्या घटनांचे भान ठेवून त्याच्या खोलात गेलात तर,
अभियंता मनुष्याचं जीवन अधिक सुखकर बनवण्यासाठी खूप मोलाचं काम करु शकतात.
पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाने अनेक रत्न घडविण्याचं काम केलं आहे. यापुढेही अधिक रत्ने घडविण्याचे काम करावे, असेही श्रावण हर्डीकर म्हणाले.

भारतीय प्रशासकीय सेवेत पुणे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मोठं योगदान दिले आहे.
त्याचा खरोखर अभिमान वाटतो.
आयपीएस अधिकारी मणिपूर, आंध्र प्रदेश व त्यानंतर आता तेलंगाणा राज्यात काम करीत आहे. परंतु, अजुनही पुणे अभियांत्रिक…

 

Web Title :- Pune News | The work of COEP Alumni Association is commendable even in covid-19 period! In the spirit of the annual general meeting and engineering day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘जे मिळेल त्यामध्ये खूष’ राहाणार्‍या रिपाइंची ‘महापौर’ पदाची मागणी केवळ दबावतंत्राचा भाग !

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात वाढीचे सत्र सुरू, चांदीही महागली, जाणून घ्या आजचे नवीन दर

Pune News | बिबवेवाडीतील ESIC रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करणार; केंद्रीय मंत्री डॉ. भूपेंद्र यादव यांचे आश्वासन