Pune News : खडकी परिसरात मेट्रोच्या कामगार व रखवालदारांना धमकावून साहित्याची चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकी परिसरात मेट्रोच्या कामगार व रखवालदारांना धमकावून चोरट्यांनी येथील बॅटरी, वायर व लोखंडी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी रखवालदार मनोहर सोनवणे (वय ५३) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामासाठी सुरक्षा व्यवस्था पुरविणारा कंपनीत सोनवणे रखवालदार आहेत. खडकीतील रेंजहिल भागात मेट्रो कामगारांची वसाहत आहे. वसाहतीत सोनवणे रखवालदार आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेदहाच्या चौघेजण वसाहतीत आले. रखवालदार सोनवणे व सहकारी अजय मुखिया यांचे ब्लॅकेंट चोरट्यांनी हिसकावले. त्यांचे ब्लॅकेंट जाळण्यात आले. त्यानंतर बॅटरी, केबल वायर आणि नटबोल्ट असा २६ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रताप गिरी करत आहेत.