Pune News : तारण ठेवलेल्या 40 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरीः बँकेच्या असिस्टंट मॅनेजर तरूणीला अन् तिच्या दाजीला डेक्कन पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्राहकाने तारण ठेवलेले ४० लाखांच्या सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपटे रस्त्यावरील बँकेच्या असिस्टट मॅनेजर असणाऱ्या तरुणीने व तिच्या दाजीनेच ही चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 770 ग्रॅम दागिने व 8 लाखांची रोकड जप्त केली आहे.

याप्रकरणी किरण धोत्रे (वय 24) व दीपक ढवळे (वय 25) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एचडीएफसी बँकेचे तारण विभागातील व्यवस्थापक अतुल घावरे (वय 44) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी किरण ही आपटे रस्त्यावर असलेल्या एचडीएफसी बँकेत असिस्टट मॅनेजर होती. यावेळी एका ग्राहकाने बँकेकडून सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. ग्राहकाने बँकेकडे ४० लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. हे दागिने लॉकरमध्ये ठेवले जातात. दरम्यान लॉकरची जबाबदारी ही तरुणीकडे होती. ८ जानेवारीला तिने लॉकरमधून दागिने चोरले. दरम्यान, लॉकरमधील दागिने चोरीला गेल्याचे यावेळी सीसीटीव्हीत हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर डेक्कन पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत तरुणीला पकडले. चौकशी केली. यावेळी तिने दागिने दाजी दीपक याच्याकडे दिले असल्याचे समजले. काही दागिने त्यांनी मोडले होते. पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून 770 ग्रॅम व 8 लाख रुपये जप्त केले आहेत. पोलीस आता उर्वरित दागिन्यांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिल्पा लंबे व उपनिरीक्षक शिंदे यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. तपास लं लबे या करत आहेत. याप्रकरणात दोघांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सूनवलीय आहे.