Pune News : कर्वेरस्त्यावरील आयडीया व व्होडाफोनचे स्टोअर चोरट्यांनी फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्वेरस्त्यावर असलेले आयडीया व व्होडाफोनचे स्टोअर चोरट्यांनी फोडले आहे. शहरात चोरटे घरासोबत दुकाने देखील फोडू लागले आहेत.

याप्रकरणी 27 वर्षीय डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावर राजेंट चेंबरमध्ये आयडीया व व्होडाफोनचे स्टोअर आहे. फिर्यादी या याठिकाणी मॅनेजर आहेत. दरम्यान हे स्टोअर सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असते. रात्री स्टोअर बंद झाल्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच येथील मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप व इतर साहित्य असा 21 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. आज सकाळी स्टोअर उघडण्यास आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.