Pune News : जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी भागात असलेले कामगार उपायुक्त कार्यालय चोरट्यांनी फोडले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद घातला असून, मामलेदार कचेरी फोडल्याचे प्रकरण ताजे असताना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर वाकडेवाडी भागात असलेल्या कामगार उपायुक्त कार्यालय चोरट्यांनी फोडले आहे. चोरट्यांनी येथून संगणक तसेच सीपीयू, तीन पंखे चोरले आहेत.

याप्रकरणी कामगार उपायुक्त कार्यालयातील निरीक्षक प्रशांत वंजारी यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार उपायुक्त कार्यालयातील दुकान विभाग कार्यालय एका शेडमध्ये सुरू आहे. २६ ते १ फेबु्रवारी या कालावधीत चोरट्यांनी शेडचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. तसेच तेथील ससंगणक, सीपीयू यंत्र, तीन पंखे असा २२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रताप गिरी करत आहेत.