Pune News : पुण्यातील रविवार पेठे आलेल्या सराफी व्यावसायिकाच्या कारमधून पाऊण किलो सोन्याची बॅग चोरटयांनी पळविली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  रविवार पेठेत आलेल्या एका सराफी व्यवसायिकाच्या कारमधून पाऊण किलो सोन्याची बॅग चोरट्यांनी पळविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेतली आहे. आज (गुरूवारी) सायंकाळी काही वेळापुर्वी हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात माळी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माळी हे सराफी व्यवसायिक आहेत. त्यांचे दुकान आहे. दरम्यान, ते खरेदीसाठी आले होते. त्यांनी 800 ग्रॅम सोने खरेदी केले होते. त्यांची कार होती. कारमध्ये त्यांनी एका बॅगेत सोने ठेवले होते. या दरम्यान ते RCM गुजराती शाळेजवळ कार उभा कृज खरेदी करण्यासाठी गेले होते. यावेळी चोरटे त्याठिकाणी आले. त्यांनी माळी यांना गाडीतून ऑइल गळत असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी कारमधून उतरून पाहण्यास सुरुवात केली. त्याच वेळी चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून पाऊण किलो सोने असणारी बॅग लंपास केली. काही क्षणात त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपींचा शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखेच्या पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.