Pune News : टिंबर मार्केट अन् बोपोडीत चोरीच्या घटना, चोरटयांकडून 3.5 लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  टिंबर मार्केट येथील दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी रोकड व चांदीची नाणी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तर बोपोडीत फ्लॅटचे दार उघड असल्याची संधी साधत चोरट्यांनी साडे तीन लाखांचा ऐवज पळवला आहे. शहरात घरफोड्याचे सत्र कायम असून, काही केल्या ते पोलिसांना रोखता येत नसल्याचे दिसत आहे.

याबाबत संकेत जैन (वय 28) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांचे टिंबर मार्केट भागात पुष्पक प्लायउड हे दुकान आहे. नेहमी प्रमाणे दुकान बंद करून गेल्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. तसेच गल्ल्यातील 4 हजार 200 रुपये व चांदीची नाणी असा 8 हजार 700 रुपयांचा ऐवज लांबविला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुशील बोबडे तपास करत आहेत.

दुसरी घटनेत बोपोडी परिसरात चोरट्यांनी एक फ्लॅट फोडला आहे. येथून रोडक आणि सोने असा 3 लाख 56 हजारांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी सुषमा घुले (वय 30, रा. गुरव चाळ, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घुले यांचे चाळीत दुमजली घर आहे. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटा घरात शिरला. कपाटातील 11 हजारांची रोकड व दागिने घेऊन चोरटा पसार झाला. अधिक तपास उपनिरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत.