Pune News : विमानतळ परिसरात चोरटयांकडून 2 फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्याचे सत्र सुरूच असून, विमानतळ येथे दोन फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हे फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला आहे. सुदैवाने मात्र चोरट्यांना तेथून काही मिळाले नाही.

याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अतुल लूटे (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोहगाव येथिल सैनिक वसाहतीत अनुदिप सोसायटीत राहतात. दरम्यान ते कामानिमित्त 18 ते 24 जानेवारी या कालावधीत घराला कुलूप लावून गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच त्यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

तर त्यांच्या शेजारचा बंद असणारा फ्लॅट देखील चोरट्यानी फोडला आहे. सुदैवाने मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.