Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत ‘बालगंधर्व’ रंगमंदिरात वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आजपासून खुली झाली. पुण्यात (Pune News) उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिरात (balgandharva-rangmandir) तिसरी घंटा झाली.

अजित पवार म्हणाले, नाटक बघत असताना जशी घंटा वाजायची तशी घंटा वाजवण्याचा सर्वांच्या साक्षीने मी प्रयत्न केला आहे. किती वेळा वाजवायची हे कोणाला माहित पण एकदाच जमून गेलं. नाट्यगृहे ५० टक्के उपस्थितीत सुरु करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत.

कोरोनाचीही रुग्ण संख्या कमी झाली असून त्याला आपल्याकडून चुकून धक्का लागू नये.
याची सर्वानीच काळजी घेतली पाहिजे. सरकार चालवताना आम्हाला हे बंद करा, ते बंद करा असे सांगायला आवडत (Pune News) नाही.
पण काही वेळेला नाईलाज असतो. सगळ्यांनाच सन्मानाने जगता आले पाहिजे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
अर्थ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे कोरोनातून आरोग्य कसे नीट ठेवता येईल याचा विचार करून तेथे जास्त निधी द्यावा लागतो.
मुळशी तालुक्यात १०० टक्के लसीकरण झाले असून कलावंतांनी, निर्मात्यांनी खूप काही सहन केल आहे असेही ते यावेळी (Pune News) म्हणाले.

 

Web Title : Pune News | third bell rang at balgandharva rangmandir in the presence of ajit pawar today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dhaagasutra | कस्टमाईज क्लोथिंगचा युनिक अनुभव देणारे ‘धागासूत्र’ पुणेकरांच्या सेवेत रुजू

7th Pay Commission | कॅबिनेटच्या निर्णयानंतर 20 हजारापासून 56 हजारपर्यंत बेसिक मिळणार्‍यांच्या पगारात होणार जबरदस्त वाढ, जाणून घ्या कॅलक्युलेशन

Post Office RD Scheme | पोस्टाची ‘ही’ योजना 10 हजाराच्या गुंतवणुकीवर देईल 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या