Pune News | तिसरा ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024’ जेष्ठ शास्त्रज्ञ् पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर
इतिहास अभ्यासक प्रदीप संजय पाटील यांना ‘श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती 2024’
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान आयोजित आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी देण्यात येणार तिसरा “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024” जेष्ठ शास्त्रज्ञ् पद्मविभूषण डॉ. श्री. रघुनाथ माशेलकर यांना आणि “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती 2024” श्री. प्रदीप संजय पाटील, इतिहास अभ्यासक (सातारा) यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, 11 ऑगस्ट 2024 रोजी सिम्बॉयसिस विश्वभवन सभागृह, सेनापती बापट रोड, पुणे येथे सकाळी 11:00 वाजता पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला श्री. गो. ब. देगलूरकर, मा. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय मंत्री), मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील (महाराष्ट्र राज्य मंत्री), श्री. प्रदीपदादा रावत आणि श्री. अमृतराव पुरंदरे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024” या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपयाचा धनादेश तसेच “श्रीमंत मोरेश्वर बळवंत पुरंदरे शिष्यवृत्ती 2024” या शिष्यवृत्तीचे स्वरूप असेल प्रशस्तिपत्रक आणि पन्नास हजार रुपयांचा धनादेश असणार आहे. कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य असेल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून
Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर
Loni Kalbhor Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी