Pune News : युरोप, दुबईहून पुण्यात येणार्‍यांना 7 दिवस हॉटेलमध्ये ‘क्वारंटाईन’ तर पुढचे 7 दिवस घरीच राहणे बंधनकारक : अति. आयुक्त रुबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- ब्रिटन मध्ये कोरोनाचे दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण आढळून आल्याने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. राज्य शासनाने यासंदर्भात कडक पावले उचलली असून महापालिकेनेही अत्यावश्यक काळजी घेतली आहेत. विशेषतः युरोप आणि दुबई मधून येणाऱ्या प्रवाशांना येथे उतरल्यानंतर सात दिवस हॉटेल मध्ये क्वारंटाईन राहावे लागणार असून सात दिवस घरीच राहावे लागणार आहे. तसे आदेश आज संध्याकाळपर्यंत काढण्यात आले आहेत.

ब्रिटन मध्ये दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. पूर्वीपेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळल्याने ब्रिटन मध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. तर जवळपास सर्वच देशांनी ब्रिटन मधून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेनेही परदेशातून विशेषतः युरोप आणि दुबई तुन विमानाने येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस हॉटेल मध्ये क्वारंटाईन केले जाणार आहे. पाचव्या दिवशी RTPCR टेस्ट घेतली जाणार आहे. सात दिवसानंतर त्या प्रवाशांना घरी क्वारंटाईन केले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.