Pune News | पुण्यात नवीन अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त 5 हजार क्षमतेचे नवीन कारागृह उभारण्याचा विचार – ADG सुनील रामानंद (व्हिडिओ)

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News | पुण्यात नवीन अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त 5 हजार क्षमतेचे नवीन कारागृह (prison) उभारण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्य कारागृह प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद (ADG Sunil Ramanand) यांनी दिली आहे. त्यासोबतच नवीन पाच कारागृह सुरू करण्यात येणार आहेत. ते शिकागो आणि मियामी यांच्या धर्तीवर राहणार असून कारागृह (prison) मल्टी स्टोअर असणार आहेत.

राज्य कारागृह प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहामध्ये केलेल्या उपाययोजनाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते बोलत होते. सुनील रामानंद म्हणाले की, राज्यातील 60 कारागृहात क्षमतेपेक्षा 152 टक्के कैदी जास्त आहेत. 60 वर्षापेक्षा जास्त वयाने असणाऱ्या कैद्यांची कारागृहात वेगळी व्यवस्था केली आहे. दरम्यान, कोरोना काळात कारागृहाने केलेल्या उपाययोजनांवर मुंबई उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे.

कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेसाठी कारागृहात कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. तर सध्यास्थितीत 52 कोविड सेंटर उपलब्ध आहेत. कोरोनाच्या काळात सुरक्षा म्हणूम कैद्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती बंद केल्या होत्या. मात्र मोबाईलच्या माध्यामातून मुलाखती सुरू आहेत.  त्यानंतरही कारागृहात कोरोना पोचला. कारागृहात 73 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज पर्यंत 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कारागृहात एकूण 4 हजार 342 कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 4 हजार 157 कैदी आजपर्यंत बरे झाले आहेत. आतापर्यंत 23 हजार 424 कैद्यांचे लसीकरण झाले आहे तर, राज्यातील 3 हजार 660 कारागृहातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

ठाणे, रत्नागिरी आणि नाशिकमध्येही कारागृह टुरिझम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
त्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून ठाणे, रत्नागिरी आणि नाशिकमध्ये कारागृह टुरिझम सुरु करणार आहोत.
शाळा-कॉलेजात विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना इतिहास समजावा हा कारागृह टुरिझममागचा हेतू आहे.
येरवडा येथे नवीन कारागृह बांधण्यासाठी खाजगी बिल्डर सोबत आम्ही करार करणार आहोत.
पण अद्याप प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच मुंबईत अजून एक कारागृह बांधले जाणार आहे.
त्या ठिकाणी कच्चे कैदी ठेवले जाणार आहे. गृहमंत्र्यालयाकडे त्या संदर्भात प्रस्ताव दिला आहे.

Web Title : Pune News | Thought to set up a new 5000 capacity prison in Pune – ADG Sunil Ramanand

Pune News | पुणे जिल्हयात सुमारे 10000 अपार्टमेंट ! आता क्षेत्रफळानुसार अपार्टमेंटधारकांना द्यावा लागणार मेंटेनन्स, जाणून घ्या

Pimpri Crime News | आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बिल्डर मेहतासह 7 जणांवर गुन्हा दाखल; पार्किंगसाठी सोय करुन देतो सांगून केली होती फसवणूक

Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने तरूणीसोबत केली ‘मज्जा’ अन् दुसरीसोबत केला विवाह, तरूणावर बलात्काराचा FIR