Pune News | शेतातील खड्ड्याने घेतला तीन चिमुकल्या भावंडांचा जीव

0
117
Pune News three childrens passes away in a farm near ambegaon khed taluka pune collapse in pot hole in farm
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत कोसळणार्‍या पावसामुळे (Pune Rains) सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. धरणे, नद्या, ओढे – नाले पूर्ण भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतांना सुद्धा तलावाचे रुप आले आहे. अशा परिस्थितीत खेड तालुक्यातील (Khed Taluka) आंबेठाण परिसरात (Ambegaon Area) शेतातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून 3 छोट्या भावंडांचा मृत्यू झाला (Death Of 3 Brother). या घटनेमुळे एकाच कुटुंबावर हा खुप मोठा आघात झाला आहे. (Pune News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातील खड्ड्यात पडल्याने राकेश किशोर दास (वय 5), रोहित किशोर दास (वय 8) तसेच श्वेता किशोर दास (वय 4) या तिन भावंडांचा मृत्यू झाला आहे.

 

आंबेठाण येथे नामदेव भिकाजी लांडगे यांच्या मालकीचे शेत आणि बाजूलाच भाऊसाहेब निवृत्ती लांडगे यांचे घर आहे.
तिथे किशोर जोगेश्वर दास हे आपल्या कुटुंबासह राहतात. (Pune News)

 

शेतात पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ राकेश, रोहित आणि श्वेता ही तिन भावंडे खेळत असताना यातील एकजण खड्ड्यात पडला.
त्याला वाचवताना दुसरे दोघेही खड्ड्यात पडले. खड्डा खोल असल्याने तीघांचाही बुडून मृत्यू झाला.
बिहार येथील जयकीसन दास यांचे कुटूंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत आहे.

 

Web Title :- Pune News | three childrens passes away in a farm near ambegaon khed taluka pune collapse in pot hole in farm

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा