Pune News | येरवडा जेलमध्ये धुवायला लावले कपडे, बाहेर पडताच घेतला बदला; पुरंदरमध्ये तरुणाचा निर्घृण खून

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune News) येरवडा कारागृहात (Yerwada Jail) शिक्षा भोगत असताना एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला आपले कपडे धुवायला लावल्याचा बदला (Revenge) बाहेर येताच घेतला. येरवडा कारागृहात पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला लावणे (washing clothe) अशी कामे सांगितल्याचा राग कैद्याच्या मनात होता. कारगृहातून बाहेर येताच त्याने पुरंदरमधील (Purandar) एकचा निर्घृण खून (Brutal Murder) करुन मृतदेह सातारा जिल्ह्याच्या (Satara District) हद्दीत टाकला. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी (Lonand Police) मुख्य आरोपीला अटक (Arrest) केली आहे. तर त्याचा साथीदार फरार झाला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार (criminal) आहेत

मंगेश सुरेंद्र पोम (वय-35 रा. पोमणनगर, ता. पुरंदर) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर वैभव सुभाष जगताप (वय-28 रा. पांगारे, ता. पुरंदर) याला लोणंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याचा साथीदार ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. वैभव आणि ऋषीकेश या दोघांनी मिळून मंगेशचा खून केला.

कारागृहातून बाहेर येताच घेतला बदला

मयत मंगेश पोम (Mangesh Pom) हा काही दिवसांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यात पुण्यातील येरवडा कारगृहात शिक्षा भोगत होता. तर आरोपी वैभव हा देखील एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगायला येरवडा कारागृहात आला होता. याच दरम्यान मयत मंगेश याने वैभवला पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला लावणे अशी कामे लावली होती. याचा राग वैभवला आला होता. हे दोघे शिक्षा भोगून बाहेर आले होते.

खून करुन मृतदेह टाकला सातारा हद्दीत

शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आरोपी वैभव याने साथिदार ऋषीकेशच्या मदतीने मंगेशचा निर्घृण खून केला.
यानंतर त्याचा मृतदेह खंडाळा तालुक्यातील (Khandala taluka) वाठार बुद्रुक (Wathar Budruk) गावच्या हद्दीत टाकला.
पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपी वैभवला अटक केली आहे.
दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.
त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात (police station) अनेक गुन्हे (Crime) दाखल आहेत.
पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा

कोरोनातून बरे झाल्यावर ‘या’ गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन, अन्यथा…


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | took revenge for prisoner force to wash clothes in yerwada jail murder in purandar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update