Pune News | टॉय ट्रेड असोसिएशनतर्फे लहान मुलांच्या कोविड सेंटरला खेळणी भेट

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) वतीने येरवड्यातील (Yerwada) डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (Dr. Babasaheb Ambedkar Government Hostel) येथे सुरु केलेल्या लहान मुलांसाठीच्या कोविड सेंटरला (Covid Center) टॉय ट्रेड असोसिएशनच्या वतीने खेळणी भेट दिली आहेत.

Modi Cabinet Meeting | मोदी सरकारचा मोठा निर्णय | शेतकर्‍यांपर्यंत पोहचतील 1 लाख कोटी रुपये, कोरोना मदत पॅकेजची घोषणा

Pune News | Toy gift from the Toy Trade Association to the Children’s Covid Center

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद
रांका (Fatehchand Ranka, President, Pune Chamber of Commerce) , सचिव
महेंद्र पितळिया (Secretary Mahendra Pitalia) , नगरसेवक अविनाश साळवे यांच्या हस्ते ही
खेळणी कोविड सेंटरला भेट दिल्याची माहिती टॉय ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण (Pramod Chavan, President, Toy Trade Association) यांनी दिली.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली असून यामध्ये लहान मुले बाधित होण्याची भितीदेखील व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने येरवड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात लहान मुलांसाठी 50 बेडचे कोविड सेंटर सुरु केले आहे.


कोरोना बाधित झालेली मुलं घरातील माणसांपासून दूर राहताना त्यांचे मन खेळण्यात रमावे आणि त्यातून ते लवकरात लवकरात बरी व्हावीत या उद्देशाने ही खेळणी टॉय ट्रेड असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहेत. याप्रसंगी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, नगरसेवक अविनाश साळवे, असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण, उपाध्यक्ष बसंतशेठ जैन, कोषाध्यक्ष जयसिंह सुभेदार, उमेश गाला, दिलीप बलकवडे, अनिल शाह, गणेश बलकवडे, विश्वेष देशपांडे, भास्कर बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटामुळे व्यापारी अडचणीत आला आहे. मात्र, संकट काळातच माणुसकी दिसते. या माणुसकीला जागून आम्ही लहान मुलांसाठीच्या कोविड सेंटरला ही खेळणी भेट दिली आहेत. तिसरी लाट येऊ नये अशीच इच्छा आहे. परंतु, आपल्या हातात काही नाही. ती जर आली आणि जास्त प्रमाणात मुलं बाधित झाली तर, आणखी खेळणी आम्ही भेट देऊ, असे टॉय ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण यांनी सांगितले.

लहान मुलांसाठी सुरु केलेल्या कोविड सेंटरला खेळणी भेट देण्याचा अतिशय चांगला उपक्रम टॉय
ट्रेड असोसिएशनने केला आहे. व्यापारी स्वतः अडचणीत असूनदेखील ते मदतीला धावून येत आहेत.
ही बाब अतिशय महत्वाची आहे आणि आपल्यातली माणुसकी अजून जीवंत आहे हे दर्शवणारी
आहे, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका (Fatehchand Ranka) व सचिव महेंद्र
पितळिया (Mahendra Pitalia) यांनी यावेळी सांगितले.
ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Toy gift from the Toy Trade Association to the Children’s Covid Center

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update