…जेव्हा महिला पोलिस रजिया सय्यद हातात झाडू घेतात, SP कॉलेज जवळ झाला होता अपघात, होतंय कौतुक (व्हिडीओ)

पुणे (Pune ) : पोलिसनामा ऑनलाइन – पुणेकर नेहमी वाहतूक पोलिसांना नावच ठेवत असतात हे अनेकदा पाहिला मिळाले आहे. पण जेव्हा हेच पोलीस चांगले काम करतात तेव्हा त्यांच तोंडभरून कौतुक देखील करत असतात याचा प्रत्यय आज वाहतूक विभागाला आला. अपघातानंतर रस्त्यांवर काचांचा साचलेला ढीग एका वाहतूक नियमन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन काढला. त्यामुळे ‘त्या’ महिला कर्मचाऱ्याचे कौतुक तर होत आहेत. पण त्याचा एक व्हिडिओ एका नागरिकाने काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

रजिया सय्यद असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस नाईक सय्यद या खडक वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत.

 

 

 

 

 

 

 

माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी वर्दळीच्या टिळक रस्त्यावर एसपी कॉलेजच्या चौकात दुचाकी व रिक्षाची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. पण काचा फुटल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काचा पडल्या होत्या. त्याचवेळी चौकात कर्तव्यावर असणाऱ्या खडक वाहतूक विभागाच्या पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करीत वाहतूक सुरळीत केली. परंतु रस्त्यावर साचलेल्या काचामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे रजिया सय्यद यांनी शेजारच्या दुकानातून झाडू घेतला. तसेच रस्त्यावरच्या काचा झाडून बाजूला केल्या. रजिया सय्यद यांच्या या प्रसंगावधानामुळे होणारे संभाव्य अपघात टळले. कृपया कार्य तत्परतेमुळे या चौकातून येणारा जाणारा प्रत्येक जण त्यांचे कौतुक करताना दिसत होता. एका नागरिकांने त्याचा व्हिडीओ काढला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खडक वाहतूक विभागाचे सहाय्यक निरीक्षक एम. के. आदलसिंग यांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले आहे.