Pune News : पुणे पोलिस आयुक्तालयातील 4 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; चंदननगर आणि वानवडीच्या व.पो.नि. पदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहर पोलिस दलातील 4 पोलिस निरीक्षकांच्या आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. वानवडी आणि चंदननगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, वानवडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची कोर्ट कंपनीत नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने अप्पर आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत.

बदली करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे –

1. दिपक माणिकराव लगड (गुन्हे शाखा – पोलिस आयुक्तांचे वाचक ते व.पो.नि. वानवडी पो.स्टे.)

2. क्रांतीकुमार तानाजी पाटील (व.पो.नि. वानवडी ते कोर्ट कंपनी)

3. अर्जुन गोविंद बोत्रे (पोलिस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ पो.स्टे ते विशेष शाखा)

4. सुनिल धोंडीराम जाधव (वाचक, अप्पर आयुक्त, पश्चिम विभाग ते व.पो.नि. चंदनगर पो.स्टे.)