Pune News : संविधान सभेची चर्चा मराठीत अनुवादित करून प्रकाशित करा, शिक्षक हितकारणी संघटनेची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  भारतीय राज्यघटने चे काम २ वर्ष ११ महिने १९ दिवस चालले होते हे सर्व Constitutional Assembly bebis मधून इंग्रजीतून प्रकाशित झालेले आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे की ज्याने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून राज्यभर साजरा करायला सुरुवात केली. अलिकडच्या काळात संविधानिक मुल्यांची चळवळ राज्यभर व्यापक बनली आहे. आपल्या सरकारनेही सत्तेत आल्यानंतर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन तसेच महाराष्ट्र दिनाच्या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाची सुरुवात केली आहे. यामुळे या चळवळीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. या साठी संविधान सभेची चर्चा मराठीत अनुवाद करून प्रकाशित करण्यात यावी अशी मागणी शिक्षक हितकारणी संघटने च्या वतीने संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केली आहे.

अधिक माहिती देताना पवार म्हणाले कि, राज्यभर संविधानाची जागृतीची चळवळ सुरु झाली आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात संविधानाचा अभ्यास करत आहे. संविधान सभेची चर्चा ही इंग्रजी आणि हिंदितून असल्यामुळे ती मराठी अभ्यासकांना समजण्यास मोठी अडचण येत आहे. या पाश्र्वभूमीवर मराठी भाषिकांना संविधान सभेची चर्चा, वाद-विवाद समजून घेण्यासाठी त्याचे सर्व खंड मराठीतून भाषांतरीत केल्यास मराठी भाषिकांना राज्य घटनेच्या ज्ञानाबद्दल सखोल अभ्यास करता येईल. त्यामुळे आमची नम्र विनंती आहे की, आपण संविधान सभेतील झालेली चर्चा, वाद-विवाद मराठी भाषेतून भाषांतर करून सरकारच्या मार्फत ती प्रकाशित करावी ही विनंती. यासाठी चे पत्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.