Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वाहक-चालक आणि प्रवाशांना उत्तम सेवा देत, त्यांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रवासी हाच केंद्रबिंदू मानून पीएमपीची सेवा सुरू आहे, असे मत नरवीर तानाजीवाडी पीएमपी आगारचे व्यवस्थापक नारायण करडे यांनी व्यक्त केले.

रस्ता सुरक्षा अभियान २०२१ निमित्त नरवीर तानाजी वाडी आगारात सर्व वाहक चालक व वर्कशॉपमधील कर्मचारी-अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मेन्टनन्स इंजिनिअर निवृत्ती भांडे, संजय गायकवाड, राजेंद्र यादव, संदीप निरवणे, अरुण उणवणे, शोभा धुमाळ, प्रकाश क्षीरसागर, सुरेश लिटके, राजेंद्र पांडे आणि कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.

करडे म्हणाले की, विना अपघात विना ब्रेकडाऊन व प्रवासीभिमुख सेवा देण्यासाठी प्रत्येकाचे मोठे योगदान आहे. ‘माझी संस्था -माझी बस- माझी जबाबदारी’ अशी संकल्प राबविण्याचा निश्चय करण्यात आला. कर्मचारी-अधिकारी आणि प्रवासांनीही मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे सांगण्यात आले. वाहकांसाठी प्रवाशांना सौजन्याने वागण्यासाठी चालकांना रोड सेफ्टी बॅच देण्यात आले. सर्व बसेसना आतून बाहेरून दिसेल असा ‘रस्ता’ सुरक्षा अभियांनाचा फलक लावण्यात आले.