Pune News | पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकामधील झाडांचे संगोपन होणे गरजेचे – हवेली भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव-पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | वाघोली गाव (Wagholi) पुणे महानगरपालिकेत (Pune Corporation) समावेश झाल्यापासून येथील पुणे नगर महामार्गावरील दुभाजकामधील झाडांची देखभाल (Pune News) करण्यात आली नाही. दुभाजकामधील झाडे खराब होत आहेत. त्यामुळे येथील दुभाजकामधील झाडांची देखभाल करण्यासंदर्भात हवेली भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव-पाटील (Anil Satav Patil) यांनी पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे.

अनिल सातव पाटील म्हणाले, ‘पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालयात आम्ही वाघोली येथील पुणे-नगर महामार्गावरील दुभाजकामध्ये रोटरीक्लब ऑफ वाघोली व वाघोली हाउसिंग सोसायटी असोशीएषण यांच्या माध्यमातून मागील एक वर्षापुर्वी वाघेश्वर मंदिर ते केसनंद फाटा या ठिकाणी लावलेल्या झाडांची निगा राखून संगोपन देखभाल करण्यासाठी व ऑनलाईन तक्रारी दिल्यानंतर त्या समस्या न मिटवताच तक्रार क्लोज करण्यात येत असल्यामुळे संबधित अधिकाऱ्यांना भेटुन लवकरात लवकर यावर कारवाई करून झाडांच्या संगोपनाचे काम सुरु करावे, असं ते म्हणाले. (Pune News)

दरम्यान, ‘झाडांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे. वाघोली गाव पुणे महानगर पालिकेमध्ये समावेश झाल्यापासून या झाडांची देखभाल करणेत आलेली नाही.
त्यामुळे हि झाडे खराब होत आहेत.
वाघोली येथील पुणे-नगर महामार्गावर पुणे महानगरपालिकेचे विध्युत विभाग,
आकाश चिन्ह विभाग त्या-त्या विभागाची कामे करीत आहेत.
पण, गार्डन विभागामार्फत कोणतेही काम होत नसल्याचे अनिल सातव-पाटील (Anil Satav Patil) यांनी सांगितलं.

 

Web Title :-  Pune News | Trees need to be nurtured in Pune-Nagar highway divider – Haveli BJP’s Yuva Morcha President Anil Satav-Patil

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सराईत गुंडाने आपल्याच बहिणीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; खडकी परिसरातील घटना

 

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर कमी; जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

 

Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण