Pune News | पर्यावरणाशी समतोल साधत पुण्यात होणार भूमिगत विकास

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | अलीकडच्या काळामध्ये विकासाबरोबरच पर्यावरणाचे संतुलन राखणेही महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे पुण्यासारख्या (Pune News) वेगाने पसरणाऱ्या शहरावर विकासकामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु, जगातील विकसित शहरांनी पर्यावरणाशी समतोल राखत भूमिगत विकासाचा पर्याय स्वीकारला आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, मॉन्ट्रियल, रिओ दि जनेरो, स्टॉकहोम, हेलसिंकी, माद्रिद, ऑस्लो, टोकियो, सिडनी, सिंगापूर, क्वालालंपूर, हाँगकाँगसह चीन व इतर देशांतील अनेक मोठ्या शहरांनी भूमिगत जागेचा प्रभावी वापर करीत शहराची गतीही वाढविल्याचे दृष्टीक्षेपात आहे. त्याच धर्तीवरच आता निवडक शहरांतील विकासकामांचा अभ्यास करूनच पुण्यातील बोगद्यांविषयीचे धोरण अंगीकारण्यात आले आहे.

पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) मंजूर विकास आराखड्यात पाषाण (पंचवटी) ते कोथरूड (सुतारदरा) व पाषाण (पंचवटी) ते गोखलेनगर (सेनापती बापट रस्ता) असे दोन बोगदे प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर सहकारनगर (तळजाई) ते सिंहगड रस्ता व वारजे ते कोथरूड (आशिष गार्डन डीपी रस्ता) या बोगद्यांचेही प्रस्ताव महापालिकेपुढे आहेत. पुण्यातील प्रस्तावित बोगदे वेळ व इंधन बचतीसह नागरिकांच्या उत्पादकतेत वृद्धी करणारे ठरतील, असा विश्वास महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Narayan Rane | राणेंच्या अटकेचा आदेश नेमका कुणी दिला? CM ठाकरे, अजित पवार, आणि अनिल परब?

‘इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन’च्या अहवालात मानवी इतिहासात आतापर्यंत झालेल्या शहरीकरणापेक्षा अधिक शहरीकरण या सहस्रकाच्या पहिल्या ३० वर्षांत होईल, असे अनुमान संयुक्त राष्ट्रसंघाने वर्तविल्याचे नमूद केले आहे. दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वाढणार आहे. २०५० पर्यंत जगातील एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के लोक हे शहरांमध्ये असतील. परंतु, त्यामानाने शहरांचे क्षेत्रफळ वाढू शकणार नाही. त्यामुळे भूमिगत पर्यायांचा योग्य वापर केला, तर लोकसंख्या वाढूनही शहरे सुनियोजित पद्धतीने विकसित करता येऊ शकतील, हा विचार आता जगभर रुजण्यास सुरुवात झाली आहे.

१९६० च्या दशकात कॅनडातील मॉन्ट्रियलने भूमिगत विकासाचे धोरण स्वीकारले होते. या शहरात ३३ किमी भूमिगत रस्त्यांचे जाळे असून माद्रिदमधील प्रचंड वाहतूककोंडीवर तोडगा म्हणून तेथे ४३ बोगद्यांद्वारे हा प्रश्न सोडविण्यात आला. ऑस्लो येथील भूमिगत रिंग रोडनंतर स्टॉकहोममध्येही भूमिगत बायपासचे काम सुरू असून, त्यासाठी २० बोगद्यांचा वापर केला जाणार आहे.

२०१९मध्ये सिंगापूरने तयार केलेल्या विकास आराखड्यात विद्युत उपकेंद्रे, बस स्थानके, रेल्वे आणि
रस्ते, मलनिःसारण वाहिन्या अशा विविधांगी भूमिगत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे.
त्याचधर्तीवर पुण्यातील प्रस्तावित बोगद्यांसाठी सर्वेक्षण करून व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित विभागांकडून परवानगी मिळालेली आहे.
यांसदर्भात बोलताना महापालिकेचे सभागृहाचे नेते गणेश बिडकर म्हणाले, जमिनीवर विकासकामे
करण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे बोगद्यांचा वापर करून शहराचा विकास करणे गरजेचे आहे.
जगातील अनेक देशांमध्ये भूमिगत विकासाचा पर्याय निवडला गेला आहे. तेच धोरण आता पुण्यात
राबविले जाणार आहे. त्यामुळे वाढत्या नागरिकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सुटण्यास मदत होईल.

हे देखील वाचा

Post Office मधून सुकन्या समृद्धी योजनेत जमा लाखो रुपये झाले ‘गायब’, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण?

Pune Crime | चोरीचे 15 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील एकाला अटक

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | tunnels will lay the foundation of new pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update