Pune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा’; दोघांनी चतुःश्रृंगी परिसरात तरूणाला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chatushringi | चतुःशृंगी भागात बँकेत पैसे भरण्यास निघालेल्या तरुणाला दोन तरुणांनी अडवून तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा आहे. असे म्हणत 37 हजार रुपये घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या तरुणाला या लुटारूंनी जाता जाता पोलिसांत तक्रार दिल्यास काम करू न देण्याची धमकी देखील दिली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी अविनाश जैसवार (वय 28, बालेवाडी) यांनी चतुःशृंगी (Chatushringi) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश हे बालेवाडी येथील लेबर कॅम्प येथे राहतात.
दरम्यान ते दोन दिवसापूर्वी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे आणि त्यांच्या मित्रांचे असे ऐकून 37 हजार रुपये घेऊन बँकेत भरण्यासाठी दुचाकीवर जात होते.
यावेळी बाणेर येथील चाकणकर चौकाजवळ अविनाश यांना शाईन दुचाकीवर आलेल्या दोन चोरटयांनी दुचाकी आडवी लावत अडविले.

तसेच तू सकाळी माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आणि आताही तुझ्या खिशात गांजा आहे, असे म्हणत धमकावले.
तसेच जबरदस्तीने खिशात हात घालून त्याच्याजवळील 37 हजार रुपयांची रोकड काढून घेतली. यानंतर या चोरट्यांनी जाताजाता अविनाश याला पोलिसांत तक्रार दिली तर काम करू देणार नाही अशी धमकी देखील दिली आहे.
अधिक तपास चतुःशृंगी पोलीस करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Pune News | two criminals robbed the youth in the chaturshringi area

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले