Pune News | वारकर्‍यांच्या दिंडीला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; 20 जखमी, मावळ तालुक्यातील साते फाट्यावरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | आळंदी येथील (Alandi) संजीवन समाधी सोहळ्यासाठी येत असलेल्या पायी पालखीच्या दिंडीत एक टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात 20 वारकरी जखमी झाले. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मावळ तालुक्यातील साते फाटा येथे आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोघा महिला वारकर्‍यांचा मृत्यु झाला आहे. (Pune News)

खालापूर (Khalapur) येथील माऊली कृपा चरिटेबल ट्रस्टच्या वतीने खालापूर ते आळंदी (Khalapur to Alandi) असा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखीमध्ये सुमारे 200 वारकरी सहभागी झाले आहेत. हे वारकरी मुंबई-पुणे महामार्गाने पायी येत होते. पायी पालखी साते फाटा येथे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आली होती. एक टेम्पो मुंबईहून पुण्याकडे (Mumbai to Pune) येत होता. हा टेम्पो रस्त्याच्या कडेने जाणार्‍या वारकर्‍यांच्या समुहामध्ये घुसला. त्यात 20 वारकारी जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमी वारकर्‍यांना रुग्णालयात दाखल केले आहे. कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये 14 वारकर्‍यांवर उपचार करण्यात येत आहे. यामध्ये दोन महिलांचा मृत्यु झाला आहे. अपघातात जखमी झालेले वारकरी हे प्रामुख्याने 60 ते 70 वयोगटातील असून त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

 

Web Title :- Pune News | two killed 20 injured road mishap varkari dindi alandi mumbai to pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thackeray Government | ठाकरे सरकारकडून कोविडने मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत ! ‘ही’ कागदपत्रे बंधनकारक; जाणून घ्या नियम व अटी

Punit Balan Group | पहिल्या ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; हेरंब क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांचा सलग दुसरा विजय !

Devendra Fadnavis | भाजपमध्ये कोणते बदल होणार का? HM अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीसांचे मोठे विधान